महाराष्ट्र केसरी विजय चौधरीच्या नोकरीसाठी विरोधक एकवटणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

मुंबई - मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळाच्या सभागृहात एखाद्या विषयासंबंधी आश्‍वासन देणे व त्याची पूर्तता न करणे हा सभागृहाचा अवमान आहे. विजय चौधरी पहिल्या वेळेस महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर नोकरीची मागणी केली होती. याबाबत अधिवेशनापूर्वी निर्णय न झाल्यास मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करणार असल्याचे विधान परिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.

विजय चौधरीच्या नोकरीसंदर्भात मित्रपक्षाला सोबत घेणार असल्याचे सांगत मुंडे म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन देऊन 80 दिवस झाले आहेत. तरीही तांत्रिक पूर्तता करत आहेत, असे मुख्यमंत्री सांगतात. यावरून राज्याच्या कारभाराची गती समजते, असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला. 

Web Title: maharashtra kesari vijay chaudhary