Laxman kevate: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पहिले एसटी वाहक लक्ष्मण केवटे याचं निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Laxman kevate: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पहिले एसटी वाहक लक्ष्मण केवटे याचं निधन

Laxman kevate: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पहिले एसटी वाहक लक्ष्मण केवटे याचं निधन

महाराष्ट्रातील पुणे-अहमदनगर मार्गावर १ जून १९४८ रोजी धावणाऱ्या पहिल्या राज्य परिवहन बसचे चालक लक्ष्मण केवटे यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते 99 वर्षांचे होते.

मुंबईपासून २७५ किमी अंतरावर असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील माळीवाडा भागातील त्यांच्या राहत्या घरी केवटे यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. केवटे यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. Marathi Tajya Batmya

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पहिले एसटी वाहक श्री.लक्ष्मण शंकर केवटे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःख देणारी आहे. १९४८ साली महाराष्ट्रात सुरु झालेल्या एसटीचे पहिले वाहक म्हणून सेवा बजावणारे श्री.केवटे यांनी एसटी महामंडळाच्या सेवेत मोलाचे कार्य केले आहे.

त्यांची अलौकिक सेवा सर्व एसटी कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. महाराष्ट्रात प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाची असणाऱ्या एसटी सेवेने असंख्य प्रवाशांना आपलेसे केले आहे.

या एसटीच्या प्रवासाची सुरुवात करणाऱ्या श्री.केवटेंचा जीवनप्रवास जरी थांबला असला तरी एसटीच्या इतिहासात त्त्यांच्या कार्याची दखल कायमस्वरूपी घेतली जाईल. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो तसेच केवटे कुटुंबाला दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली. Latest Marathi News

स्वातंत्र्यानंतर राज्य परिवहनने महाराष्ट्रात पहिली बससेवा सुरू केली तेव्हाची ही ऐतिहासिक तारीख आहे. परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, केवटे यांनी राज्य परिवहन महामंडळात ३६ वर्षे काम केले. 30 एप्रिल 1984 रोजी ते निवृत्त झाले. मात्र, सेवानिवृत्तीनंतरही ते परिवहन महामंडळाच्या कार्यात सक्रिय राहिले. Marathi Tajya Batmya

टॅग्स :CM Eknath ShindeST