दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Breaking News

दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

परदेशी महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपी मनीष गांधीविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : परदेशी महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपी मनीष गांधीविरोधात मुंबईच्या आंबोली ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

आरोपी मनीष गांधी याने २०१६ ते २०२२ या कालावधीत महिलेवर अनेकदा बलात्कार केला. आरोपी महिलेचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करायचा, त्या आधारे तो महिलेला धमकावायचा आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ​​असे.

गुवाहाटीमध्ये रेल्वेच्या डब्यांना भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

गुवाहाटीमध्ये रेल्वेच्या स्थिर रेकच्या दोन रिकाम्या डब्यांना आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही:

हसन मुश्रीफांना ED चा समन्स, पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

हसन मुश्रीफांना ED ने समन्स पाठवला आहे. पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

भाजपच्या माजी मंत्र्यांला कॉलगर्ल्सने दिला चोप?

भाजपच्या मध्य प्रदेशातील एक आमदाराला आणि त्याच्या दोन मित्रांना गोव्यात कॉल गर्ल्सने बेदम मारहाण केल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. काँग्रेसने आपल्या ट्विटरवरुन ही बातमी पोस्ट केली आहे. ही बातमी पोस्ट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग 

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली होती. अग्निशामक दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अखेर अगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे..

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, निती आयोगाचं आवाहन

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन निती आयोगानं केलं आहे. भारतात नव्या H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूच्या संसर्गाने चिंता वाढवली आहे. देशात या संसर्गामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. H3N2 इन्फ्लूएंझामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झालं आहे.

सदानंद कदम यांना 14 दिवसांची कोठडी देण्याची ईडीची मागणी 

हुपरी कालव्यात बेवारस कारमध्ये मृतदेह आढळला

हुपरी (जि. कोल्हापूर) : : येथील जवाहर साखर कारखाना परिसरातील ज्योतिर्लिंग मंदिराच्या पिछाडीस असलेल्या डाव्या कालव्यात मृतदेहासह चारचाकी मोटार जळालेल्या अवस्थेत आढळून आली. ही घटना आज शनिवारी (ता.११) सकाळी उघडकीस आली. हा अपघात की घातपात याची जोरदार चर्चा सुरू आहे.

मुश्रीफांसाठी कार्यकर्त्यानं रक्तबंबाळ होईपर्यंत डोकं आपटून घेतलं

ED Raid Hasan Mushrif House Kagal : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर आज पुन्हा ईडीचे छापे पडले आहेत. ईडीनं गेल्या दीड महिन्यांत दुसऱ्यांदा हे छापे टाकले आहेत. आज सकाळी सात वाजल्यापासूनच ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी छापा टाकण्यासाठी आले. मुश्रीफांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून घराबाहेर कार्यकर्ते ठिय्या मांडून बसले आहेत. एका कार्यकर्त्यांनं मुश्रीफांवरील कारवाईचा रस्त्यावर डोकं आपटून निषेध केला आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात GST विभागाचे छापे; सराफ दुकानावर कारवाई

छत्रपती संभाजीनगर शहरातील एका सराफाच्या दुकानावर जीएसटी पथकाने छापेमारी केली आहे. बाफना ज्वेलर्स असं कारवाई करण्यात आलेल्या सराफ दुकानाचं नाव आहे.

कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आर. ध्रुवनारायण यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आर. ध्रुवनारायण यांचं शनिवारी निधन झालं. त्यांनी म्हैसूरमधील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

मुश्रीफ समर्थक आक्रमक; सरकारविरोधात घोषणाबाजी

मुश्रीफ समर्थकांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. ईडी विरोधातही घोषणा दिल्या तर सुडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप केला आहे.

विरोधकांना घाबरवण्यासाठी ईडीची कारवाई - नाना पटोले 

विरोधकांना घाबरवण्यासाठी ईडीची कारवाई करण्यात येत असल्याचं नाना पटोले यांनी म्हंटलं आहे, तर केंद्रीय तपास यंत्रणा यांच्याविरोधात काँग्रेस मोर्चा काढणार आहे.

सतीश कौशिक यांच्या मृत्यू संशयास्पद; दिल्ली पोलिसांचा दावा

बॉलीवूडमधील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा मृत्यु हृदय विकाराच्या झटक्याने झाला असल्याचे स्पष्ट केल्यानंतर या प्रकरणार दिल्ली पोलिसांनी पुन्हा एक मोठी अपडेट दिली आहे. हा मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी काही महत्वाचे पुरावे त्यांच्या हाती लागले आहेत.

हसन मुश्रीफांच्या ईडीच्या रडारवर, पुन्हा एकदा छापेमारी

गेल्या काही दिवसांपासून हसन मुश्रीफ ईडीच्या रडारवर आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या अडचणीमध्ये देखील वाढ होत आहे. पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत. यावेळी त्यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली. तर घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ईडीचे अधिकारी दाखल झाले आहेत. सलग तिसऱ्यांदा ईडीकडून ही छापेमारी सुरु आहे. पाच गाड्यांमधून ईडीचे अधिकारी मुश्रीफांच्या घरी सकाळी 7 वाजता दाखल झाले आहेत.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर