16 May News Updates: दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
Bike accident on Khadakwasla road One youth died one injured pune police
Bike accident on Khadakwasla road One youth died one injured pune policeesakal

टेम्पो आणि रिक्षाचा भीषण अपघात; नऊ जणांचा जागीच मृत्यू

उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात मंगळवारी एक भीषण अपघात झाला. हा अपघात रिक्षा आणि टेम्पोमध्ये झाला. हा अपघात इतका भीषण होता की आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन मुले गंभीर जखमी झाली. जहानाबादमधील मिरची मोडजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गदारोळ झाला. अपघाताची माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघाताच्या वेळी रिक्षामध्ये 14 जण होते. एकत्र आठ मृतदेह पाहून सर्वांनाच धक्का बसला.

कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरला! काँग्रेस अध्यक्ष उद्या करणार घोषणा

कर्नाटकातील १६ व्या विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसनं (Congress) १३५ जागा जिंकल्यानंतर आता पुढील मुख्यमंत्री कोण याकडं संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. मात्र मुख्यमंत्री पदाबाबद निर्णय झाल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस हायकमांड उद्या बेंगळुरूमध्ये मुख्यमंत्री पदाची घोषणा करणार आहेत.

लाचखोर सतिश खरे याला चार दिवसांची पोलीस कोठडी

नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत तक्रारदार संचालका विरोधातील सुनावणीमध्ये मदत करण्यासाठी 30 लाख रुपयांची लाच घेताना जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना रंगेहात अटक करण्यात आली होती. त्याला 19 मे पर्यंत पोलिस कोठडी, तर शैलेश सभद्रा याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

संजय राऊत यांना अटक पूर्व जामीन मंजूर

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या विरोधात नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्यात पोलिसांनी केला गुन्हा दाखल केला होता.

काही दिवसांपूर्वी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे सरकार बेकायदेशीर असून या सरकारचे आदेश पाळू नये अशा प्रकारचं आवाहन त्यांनी केले होते. सरकारी यंत्रणांना केल्याच्या अनुषंगाने पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला होता.

पोलीस हवालदार केदारे यांच्या फिर्यादीने हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

डी.के शिवकुमार मल्लिकार्जुन खर्गेंच्या भेटीला

कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले.

अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा

सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर झाला असून यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई लवकर मिळण्यास मदत होईल.

मंदिरात येणाऱ्या नागरिकांचे आधार कार्ड तपासा, आनंद दवेंची अजब मागणी

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात 2 दिवसांपुर्वी काही अन्यधर्मीयांनी बळजबरीने शिरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मंदिर प्रशासनाने केला होता. या विषयाला धरून आता हिंदू महासंघाने मागणी केली आहे. राज्यातील सर्व महत्वाच्या मंदिरात येणाऱ्या नागरिकांचे आधार कार्ड पाहूनच प्रवेश द्यावा अशी अजब मागणी आनंद दवे यांनी केली आहे.

कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार बेंगळुरूहून दिल्लीत दाखल

कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार बेंगळुरूहून दिल्लीत दाखल झाले आहेत. कर्नाटकच्या पुढील मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेण्यासाठी ते पक्षाच्या हायकमांडची भेट घेणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर तक्रार दाखल 

देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर तक्रार दाखल केला आहे. योग्य ती कारवाई करण्यात येईल. पोलिसांनी मंदिर विश्वास्तांकडून काल झालेल्या घटनेची माहीती घेतली आहे. याबाबतची माहीती पोलीसांनी दिली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी

कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी काँग्रेसमध्ये चर्चा सुरू असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी पोहोचले.

नवाब मलिक यांच्या कोठडीत वाढ

नवाब मलिक यांच्या कोठडीत वाढ झाली आहे.

विधानसभा अध्यक्ष विधानभवनात दाखल! आमदार आपत्रते बाबत तक्रारी तपासण्यात येणार

विधानसभा अध्यक्ष विधानभवनात दाखल झाले असून आज आमदार आपत्रते बाबत तक्रारी तपासण्यात येणार आहेत. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधिमंडळ अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबई दौऱ्यावर

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. खासगी कार्यक्रमासाठी ते मुंबईत आले आहेत.सर्वोच्च निकालाच्या निर्णयानंतर पहिल्यांदाच भगतसिंह कोश्यारी मुंबई आले आहेत.

संभाजीनगर पोलिसांकडून शहरात रेड अलर्ट

शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी अलर्ट जारी केला आहे. शहराच्या सुरक्षेसाठी व खबरदारीचा उपाय म्हणून एसआरपींच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

पोलिसांना उशीर का झाला? फडणवीसांनी उत्तर द्यावं- नाना पटोले

अकोला येथे झालेल्या दंगलीत पोलिस उशिरा पोहचले. अकोल्यातील दंगल पोलिसांनी घडवली का? पोलिसांनी जमावाची समजूत का नाही काढली? देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. त्याचबरोबर ते अकोल्याच्या पालकमंत्री आहेत. त्यांनी या सर्व प्रश्नांची उत्तर द्यावी असं काँग्रेसच् प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हंटलं आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरातील घटनेची फडणवीसांकडून गंभीर दखल; SIT करणार चौकशी

त्र्यंबकेश्वरमध्ये उरुस दरम्यान इतर धर्मियांकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल घडली. मंदिर प्रशासनाने वाद घालणाऱ्या जमावाला रोखलं. पोलिसांच्या आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला. मात्र जमावावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पत्र पोलिसांना देण्यात आले आहे. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ब्राह्मण महासंघाने दिला होता. आता या प्रकरणाची चौकशी एसआयटी करणार आहे.

पुढील काही दिवस तापमान वाढण्याची शक्यता

अवकाळी पाऊस आणि गारपीटीनंतर राज्यातील काही भागात गारवा निर्माण झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा अनेक भागांमध्ये उन्हाचा कडाका वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमाण 40 अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे.

मात्र आता उन्हाचा कडाका आणखी वाढणार असल्याचा अंदाज शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात आज तापमान साधारण असलं तरी उद्यापासून म्हणजेच 17 मे पासून उष्णता आणखी वाढण्याचा अंदाज आहे. याबाबत हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com