17 May News: दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर... | Maharashtra live blog updates 17 May politics sports traffic railway wea ther crime Marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bailgada- Bullock Cart Race

17 May News: दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

बैलगाडा शर्यतीचे भवितव्य उद्या ठरणार! सर्वोच्च न्यायालय देणार निकाल

तामिळनाडू जल्लीकट्टू आणि महाराष्ट्रतील बैलगाडा शर्यतींना परवानगी देणाऱ्या कायद्यांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर उद्या, 18 मे रोजी सर्वोच्च न्यायालय आपला निकाल देणार आहे.

सकाळचे भाकीत ठरले खरे, पीओपीवर राज्यात सरसकट बंदी

दैनिक सकाळने आज प्रसिद्ध केलेल्या वृत्तप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये पीओपी मूर्तीला सरसकट बंदीचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुंबईतील सह्यांद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

ट्रॅक्टर-मिनीबसमध्ये मोठा अपघात! २ ठार, १० जखमी

बुलंदशहरच्या पहासू पोलीस स्टेशन परिसरात ट्रॅक्टर आणि मिनी बस यांच्यात झालेल्या अपघातात २ ठार आणि १० जखमी

शिवरायांची जगदंबा तलवार व वाघ नख भारतात आणण्यासंदर्भात प्रयत्न सुरू - सुधीर मुनगंटीवार

छत्रपती शिवाजी महाराजाचं राज्यभिषेकाचं हे ३५० वर्ष आहे. महाराजांनी माँ जिजाऊंच्या सांगण्यावरून राज्यभिषेक केला होता. या कार्यक्रमानिमित्त महाराजांचे पराक्रम लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आम्ही १०० विविध कार्यक्रम घेतोय. या निमित्ताने आम्ही २ जून रोजी कार्यक्रम होणार असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री असतीलचं. पण पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अजून निमंत्रण देण्यात आलेलं नाही. पण वर्षभरात एका कार्यक्रमाला त्यांनी यावं असं नियोजन सुरूअसल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार व वाघ नख आणण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत. लवकरचं लंडनला आमचा एमओयू होईल ही तलवार याचं वर्षी येईल, असे मुनगंटीवार म्हणाले.

दिल्लीत शास्त्री पार्क परिसरातील झोपडपट्ट्यांना भीषण आग

दिल्ली : शास्त्री पार्क परिसरातील झोपडपट्ट्यांना भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आहे.

घटनास्थळी उपस्थित अग्निशमन अधिकारी म्हणाले, "एका झोपडपट्टीत आग लागली होती, ती इतर झोपडपट्ट्यांमध्येही पसरली. आम्हाला दुपारी बाराच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 11 गाड्या येथे पाठवण्यात आल्या. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही."

डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांनी घेतली राहुल गांधी यांची भेट

कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार आणि ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली.

१० जूनला अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सभा

१० जूनला अहमदनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची सभा होणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबाबत मल्लिकार्जुन खर्गे निर्णय जाहीर करतील

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबाबत जो काही निर्णय घेतला जाईल, ते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे जाहीर करतील. जोपर्यंत घोषणा होत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या नावाने सुरू असलेल्या बातम्या आणि अफवांकडे लक्ष देऊ नका. खर्गे साहेब करणार घोषणा : काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला

सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्री पदासाठी घोषणा होण्यापूर्वीच समर्थकांचा  जल्लोष

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्री पदासाठी घोषणा होण्यापूर्वीच त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर जल्लोष केला.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत दाखल!

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले आहे 

उध्दव ठाकरे शिवसेना भवनात दाखल

उध्दव ठाकरे शिवसेना भवनात दाखल झाले आहेत.

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; एकूण 50 आमदार आणणार हक्कभंग 

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. एकूण 50 आमदार संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याचे समोर आले आहे.

'...नाहीतर महाराष्ट्रातील सर्व मंदिर दोन दिवस बंद ठेवू', हिंदू महासंघाचा इशारा

नाशिक येथील त्रंबकेश्वर मंदिरात काही अज्ञातांनी घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून ब्राम्हण महासंघ आणि हिंदू महासभेने आंदोलन करायचा इशारा दिला. हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी त्रंबकेश्वर मंदिराचे शुद्धीकरण केले. त्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्राची सर्व मंदिर दोन दिवस बंद ठेवू असा इशारा हिंदू महासभेने दिला आहे.

गौतमीच्या कार्यक्रमात पत्रकारांना मारहाण करणारे पाच जण पाेलीसांच्या ताब्यात

गौतमी पाटील हिच्या मंगळवारी झालेल्या नाशकातील पहिल्याच कार्यक्रमात तुफान राडा झाला. यामध्ये तिच्या चाहत्यांकडून पत्रकारांना मारहाण झाली. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेत पाच जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच गौतमीचा कार्यक्रम आयोजित करणा-यांवर नियमांचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे

आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडून कारवाई सुरू

विधानसभा अध्यक्ष आज दोन्ही गटांकडून राजकीय पक्षाची घटना मागवणार असून त्याचा अभ्यास करणार असल्याचे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले आहे. तर पुढील सात दिवसांत आमदारांना भूमिका मांडण्यासाठी वेळ देणार असल्याचंही त्यांनी म्हंटलंय.

त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदू महासंघ आक्रमक 

त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदू महासंघ आक्रमक झाला आहे. मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केलेल्या लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी. CCTVमध्ये दिसणाऱ्या लोकांना त्वरित अटक करावी अशी मागणी हिंदू महासंघाने केली आहे.

उद्या होणार कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी?

कर्नाटकचा मुख्यमंत्री पदासाठी प्रमुख दोन दावेदार आहेत. यापैकी अजून एकही नाव जाहीर झालेलं नाही. मात्र उद्या कर्नाटचा मुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

'मला फसवण्यासाठी परमबीर यांचा वापर', अनिल देशमुख यांचा गंभीर आरोप

'मला फसवण्यासाठी परमबीर यांचा वापर' केला जात असल्याचे अनिल देशमुख यांनी गंभीर आरोप केले आहेत

मंदिरात जबरदस्ती कुणीही घुसण्याचा प्रयत्न केला नाही - संजय राऊत 

मंदिरात जबरदस्ती कुणीही घुसण्याचा प्रयत्न केला नाही असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणालेत. त्र्यंबकमध्ये काहीही घडलं नाही. सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट, नकली हिंदुत्वाच्या नावाने बोंबा, त्र्यंबकमध्ये घडलेल्या घटनेवर sit नेमली मग रामनवमीनंतर झालेल्या दंगलीच्या वेळी का SIT नाही नेमली असा प्रश्न संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे वर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मर्गिकेवर वाहतूक कोंडी

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे वर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मर्गिकेवर वाहतूक कोंडी, सुमारे एक किमी पर्यंत वाहनांची रांग

...तोपर्यंत छत्रपती संभाजीनगर नव्हे औरंगाबादच; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

उच्च न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत महसूल व इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयाने 'औरंगाबाद' हेच नाव लिहावे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर