दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
LIVE Update
LIVE Update

महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा मोदींच्या झोळीत टाका - अमित शाहा

केंद्रीय मंत्री अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. याठिकाणी आयोजित सभेत बोलताना अमित शाह यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा भाजप आणि मोदींच्या झोळीत टाका अशी साद महाराष्ट्राला घातली आहे.

२०१४ पूर्वी सत्तेत असलेला प्रत्येक मंत्री स्वत:ला पंतप्रधान समजत होता- शाह

2014 पूर्वी सत्तेत असलेले प्रत्येक मंत्री स्वत:ला पंतप्रधान समजत होते. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. पाक दहशतवादी आमच्या लष्करी अधिकाऱ्यांची हत्या करायचे. या दहशतवादाविरुद्ध कारवाई करण्याची हिंमत कोणातच नव्हती. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडत होती - भाजप नेते अमित शहा

मी भाजपला सोडलय, हिंदुत्वाला सोडलं नाही; उद्धव ठाकरे

उद्धव ठाकर यांनी आज उत्तर भारतीयांबरोबर संवाद साधला यावेळी त्यांनी भाजपसह एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. मी भाजपला सोडल आहे, हिंदुत्वाला सोडलं नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावलं आहे.

कोल्हापूरात अमित शाह यांची जाहीर सभा

कोल्हापूरात अमित शाह यांची जाहीर सभा चालू आहे. या सभेला जिल्ह्यातील नेते आणि मंत्री उपस्थित आहेत.

उद्धव ठाकरे यांचा थेट कायदेतज्ञ उल्हास बापट यांना फोन

उद्धव ठाकरे यांचा थेट कायदेतज्ञ उल्हास बापट यांना फोन

उद्धव ठाकरे यांच्या फोन नंतर उल्हास बापट पोहचले मातोश्रीवर

दोघांमध्ये झाली काही वेळासाठी चर्चा

आज उद्धव ठाकरे यांनी कायदेतज्ञ तसेच काही वकिलांची मुंबईत बैठक बोलावली होती

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला गेल्यानंतर उद्धव ठाकरे पुढील भूमिका काय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे

कायद्याच्या संदर्भात अनेक गोष्टींच्या मार्गदर्शनासाठी उद्धव ठाकरे यांनी उल्हास बापट यांना बोलावले होते

तेलंगणा हा भारताचा अफगाणिस्तान आहे- वाय.एस. शर्मिला

केसीआर हे तालिबानी आहेत तर तेलंगणा हा भारताचा अफगाणिस्तान आहे, असं विधान YSRTP प्रमुख वायएस शर्मिला यांनी केलं आहे.

जीएसटी काऊंन्सिलच्या ४९व्या बैठकीमधये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या अंतर्गत आणण्याची तयारी करीत आहे. परंतु राज्यांनी हे स्वीकारणं आवश्यक आहे. तसं झालं तर इंधनाचे दर मोठ्या प्रमाणावर कमी होतील, असं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे.

चिक्कमंगळुरूमधील लिंगायत नेते काँग्रेसमध्ये दाखल

चिक्कमंगळुरु : कर्नाटक विधानसभेची निवडणूक (Karanataka Assembly Election) जशी जवळ येत आहे, तसे बडे नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. दरम्यान, भाजपचे (BJP) राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी (CT Ravi) यांना घरातच मोठा धक्का बसलाय. चिक्कमंगळुरूमधील (Chikkamagaluru) लिंगायत नेते (Lingayat), माजी मुख्यमंत्री बीएस यडियुरप्पा (BS Yadiyurappa) यांचे सहकारी आणि भाजपचे समन्वयक एचडी थिमय्या (HD Thimayya) यांनी भाजपला अलविदा करत अधिकृतपणे काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला.

उद्धव ठाकरेंनी 'मातोश्री'वर बोलावली पुन्हा तातडीची बैठक

केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय दिला आहे. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटालाच दिलं आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून शिंदे गटात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी या निर्णयावर टीका केली असून आपण सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तर या निर्णया विरोधात उद्धव ठाकरे यांनी काल तातडीची बैठक बोलवली होती. त्यानंतर आज देखील उद्धव ठाकरे यांनी तातडीची महत्त्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीला महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

केंद्रीय मंत्री अमित शाहंच्या हस्ते पुण्यातील शिवसृष्टीचं उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ‘शिवसृष्टी’चा पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेमधून शिवसृष्टी पुण्यात साकारण्यात येत आहे. शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास अमित शाह लिहिणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. शिवसृष्टीतून शिवाजी महाराजांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत जाणार असल्याचं शाह यावेळी म्हणालेत.

शिवज्योत आणताना झालेल्या भीषण अपघातात दोघे शिवप्रेमी जागीच ठार

राज्यासह देशभरात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहत साजरी केली जात आहेय यादरम्यान कोल्हापूर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जयंतीचा जल्लोष सुरू असताना पन्हाळ्यावरून शिवज्योत आणत असताना भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.

उद्धव ठाकरे २१ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत महाराष्ट्र दौऱ्यावर

उद्धव ठाकरे २१ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने आगामी निवडणुकीची रणनीती आखली जाणार आहे

चिन्ह, नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा अन् व्यवहार झालेत- संजय राऊत

खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत हा आरोप केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणतात, "माझी खात्रीची माहिती आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आत्तापर्यंत २००० कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि १०० टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं."


पुढच्यावर्षी योग्य नियोजन करू- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

छत्रपती संभाजीराजे यांनी शिवनेरी गडावरील कार्यक्रमाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत. हे सरकार शिवरायांच्या विचारांचं आहे. पुढच्या वर्षी व्यवस्थित नियोजन करू असं म्हणत संभाजीराजे यांना आश्वासन दिलं आहे.

व्हीआयपी लोकांसाठी शिवभक्तांना का अडवता? जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसामोर मांडली व्यथा

व्हीआयपी लोकांसाठी शिवभक्तांना का अडवता? जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोर छत्रपती मांडली व्यथा छत्रपती संभाजी राजे यांनी मांडली आहे. जोपर्यंत शिवप्रेमींना प्रवेश दिला जात नाही, तोपर्यंत मीही गडावर जाणार नाही, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली. शिवनेरीवरील नियोजनाच्या अभावामुळे संभाजीराजे नाराज झाले आहेत त्यांनी बोलताना नाराजी व्यक्त केली.

आज मध्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक

आज मुंबईच्या पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नाही. मात्र, मध्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. ट्रॅक, ओव्हरहेड आणि सिग्नलिंग उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर 18 आणि 19 फेब्रुवारीच्या मध्यरात्री, 12 ते पहाटे 4 या वेळेत मुंबई सेंट्रल आणि माहीम स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे

शिवरायांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी गडावर साहसी खेळांच आयोजन 

शिवरायांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी गडावर साहसी खेळांच आयोजन करण्यात आलं आहे. याठिकाणच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किल्ले शिवनेरीवर दाखल

शिवजन्माचे ठिकाण असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्माचा सोहळा साजरा होत आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सोहळ्यास उपस्थित आहेत. 

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com