
दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...
पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलनाच्या ठिकाणची स्ट्रीट लाईट केली बंद
पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणचा स्ट्रीट लाईट बंद करण्यात आल्या आहेत.
त्यावेळी आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या टॉर्च लावत जयंत पाटलांच स्वागत केलेले पाहायला मिळालं.
स्ट्रीट लाईट बंद केल्या असल्या तरी विद्यार्थी आंदोलनावर ठाम.
अंधारात देखील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच.
पुण्यात लग्नासाठी विवाहित महिलेचे अपहरण
पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नासाठी विवाहित महिलेचे अपहरण केल्याचं उघडकीस आलं आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी दोन जणांविरोधात विनयभंग, अपहरण, धमकावणे या कलमांन्वये गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.
थोड्याच वेळात एकनाथ शिंदे घेणार पत्रकार परिषद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आहेत ते थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत.
सीबीआयने पुन्हा मनीष सिसोदिया यांना चौकशीसाठी बोलावले
सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दारू घोटाळा प्रकरणी नव्याने समन्स बजावले आहे. याबाबत माहिती मनीष सिसोदिया यांनी दिली आहे.
अशोक चव्हाण यांच्यावर पाळत, घातपाताचा संशय
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. माझ्यावर एक अज्ञात व्यक्ती सतत पाळत ठेवून असतू. माझ्या प्रवासाची माहिती संकलित करीत असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी पोलिसांना दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लतिका गोऱ्हे यांच्या अंतदर्शनासाठी पुण्यात
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मातोश्री लतिका गोऱ्हे (वय ८७) यांचे आज सोमवार (ता २०) फेब्रुवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या मॉडेल कॉलनी येथील निवास स्थानी गेली ४२ वर्षे त्यांचे वास्तव्य होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर असल्यामुळे त्यांनी नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वन पर भेट घेतली.
शिवसेना पक्ष मिळाल्यानंतर उद्या CM शिंदे घेणार राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक
शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्या महत्त्वाची बैठक एकनाथ शिंदे यांनी बोलाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून ते बैठकीला संबोधीत करणार आहेत.
शिवसेना कोणाची? याचा निर्णय दसरा मेळाव्यातच झाला होता - ठाकरे
बाळासाहेब ठाकरेंचा चेहरा काढून स्वतःच्या किंवा वडिलांचे नाव लावून शिवसेना चालवून दाखवा. शिवसेना कोणाची याचा निर्णय दसरा मेळाव्याच्या वेळीच झाला होता. त्यांच्या सभा रिकाम्या पडत आहेत हे बोलकं चित्र आहे.
निवडणूक आयोग बरखास्त करा - ठाकरे
शरद पवार, ममता बॅनर्जी, नितीश कुमार असे अनेकांचे फोन मला येत आहेत, हे प्रकरण देशभर पेटेल. बाकीचे पक्षही असेच संपवतील का अशी भीती आहे. निवडणूक आयोग बरखास्त केला पाहीजे. आमचा यावर बिल्कूल विश्वास नाही. यापूर्वी देखील इव्हीएम बद्दल संशय व्यक्त केला होता. आजही लोक संशय घेतात. मला वाटतं हे ताबडतोब बरखास्त करून याची सुनावणी सुप्रीम कोर्टात झाली पाहीजे असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल, म्हणाले, हाच निकष लावयाचा होता तर...
निवडणूक आयोगाने सांगितल्याने पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र आणि सदस्यसंख्या दाखवावी लागेल असं सांगितल्याने आम्ही लाखोने प्रतीज्ञापत्र दाखल केली. त्यानंतर आयोग निवडणून आलेल्या सदस्यांच्या संख्येवरून पक्ष कोणाचं हे ठरवलं जाईल. ठिक आहे पण ते पात्र आहेत की अपात्र आहेत याचा निकाल आधी व्हायला नको? हाच निकष लावायचा होता तर शंभर रुपयांच्या स्टँप पेपरवर प्रतिज्ञापत्र आमच्याकडून का घेतली?
चोरांना राज्यप्रतिष्ठा देण्याचा काळ सुरु - उद्धव ठाकरे
पक्षाच नाव आणि चिन्ह चोरणं हे पुर्वनियोजित कट आहे. चोरांना राज्यप्रतिष्ठा देण्याचा काळ सुरु आहे. शिवसेना नाव चोरलं तरी ठाकरे नाव चोरता येणार नाही. देशात हुकमशाहीचा नंगानाच सुरु होईल. हे थांबल नाही तर २०२४ ला देशातील अखेरची निवडणुक असेल. आत्ता न जागे झाल्यास
हीवेळ कोणत्याही पक्षावर येऊ शकते. निवडणुक अयोगाचा निकाल अयोग्य आहे. निवडणुक संपवण्याचा भाजपचा प्लॅन आहे. गुंता वाढविण्यासाठी निवडणुक आयोगानं घाईने निर्णय दिला. असा दावा ठाकरेंनी यावेळी केला. आयोगाचा निर्णय घटनाक्रमाला आधारीत नाही.
थोड्याच वेळात उद्धव ठाकरे माध्यमांशी संवाद साधणार
जिल्हा प्रमुखांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे माध्यमांशी संवाद साधणार आहेत. त्यापूर्वी बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्हा प्रमुखांना महत्वाच्या सूचना दिल्या.
उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार
निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहे. ठाकरे लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.
ठाकरे गटाच्या १५ आमदारांवर अपात्रतेची तलवार?
व्हीप न पाळणाऱ्यावर अपात्रतेची कारवाई करणार.
विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांना मातृशोक
विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांना मातृशोक. त्यांच्या मातोश्री श्रीमती लतिकाताई दिवाकर गोर्हे यांचे आज २० फेब्रुवारी रोजी सोमवारी सकाळी निधन झाले.
अंत्यदर्शन वेळ दुपारी २.३० ते ४.३० सिल्हररॅाक्स , हरेकृष्ण मंदिर पथ, मॅाडेल कॅालनी ,पुणे येथे आहे.
ठाकरे गटाची याचिका दाखल करुन घेण्यास सप्रीम कोर्टाचा नकार
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचे ठरवले. आज त्यांनी याबाबत याचिका दाखल करण्यासाठी गेले असते याचिका दाखल करण्यासाठी उद्या या असं त्यांनी सांगितलं आहे.
विधीमंडळाच्या कार्यालयाचा ताबा शिंदे गटाकडे
शिंदे गटाचे सर्व आमदार विधिमंडळत दाखल झाले आहेत, तसेच आता विधीमंडळातील शिवसेनेच्या अधिकृत कार्यालयाचा ताबा शिंदे गटाला मिळाला आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी आज विधीमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेत ही मागणी करणार असल्याची माहिती होती. त्यानंतर आता विधीमंडळाच्या कार्यालयाचा ताबा शिंदे गटाकडे गेला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा उद्धव ठाकरे यांना फोन
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. पक्ष आणि चिन्ह गेल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. आगामी कायदेशीर लढाई बाबत चर्चा यावेळी झाली. महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचा त्यांनी विश्वास दिला आहे.
नाशिक पाठोपाठ संजय राऊतांविरोधात ठाण्यातही गुन्हा दाखल
संजय राऊत यांच्या विरोधात ठाण्यातील शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली असून त्यांच्या विरोधात संध्याकाळी आंदोलन केल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ठाण्यातील नगर पोलिस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
लक्ष्मण जगतापांच्या उपचारासाठी कुठले औषध मागवलं; पवारांना भाजप नेत्याचा सवाल
दिवंगत लक्ष्मण जगताप आजारी असताना मी त्यांना औषधं दिली असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका सभेदरम्यान सांगितलं. हाच मुद्दा पकडत भाजप नेते गिरीश महाजन यांनी लक्ष्मण जगतापांच्या उपचारासाठी कुठले औषध मागवलं ? असा सवाल उपस्थित केला आहे.
शेअर बाजारात घसरण सुरूच
आजच्या शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली असून सेन्सेक्स-निफ्टीमध्ये लाल चिन्हात सुरुवात झाली आहे.
आजच्या BSE सेन्सेक्स 61,112.84 वर उघडला आणि NSE निफ्टी 17,965.55 वर उघडला. बँक निफ्टीमध्ये 41207 ची पातळी दिसून येत आहे आणि ते देखील चांगल्या गतीने हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहे.
उद्धव ठाकरेंना पंकजा मुंडेंचा फोन
एकीकडे भाजपचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका करत आहेत, मात्र दुसरीकडे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एक मोठं वक्तव्य केलं आहे. आपण उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बोललो आहे. मात्र काय बोललो हे माध्यमांना सांगणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
MPSC करणारे विद्यार्थी पुन्हा उतरणार रस्त्यावर
युवक काँग्रेसतर्फे पुण्यात पुन्हा एमपीएसी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. आज सकाळी 10 वाजता बालगंधर्व चौक येथे एमपीएससी निर्णयाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थिती राहणार आहेत.
डोंबिवलीतील पलावा एक्सपेरिया मॉलमध्ये आग
डोंबिवली नजीक असलेल्या पलावा येथील एक्सपेरिया मॉलमध्ये पहिला माळ्यावर आग लागल्याची घटना घडली. रविवारी रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घडली. आग लागल्यामुळे मॉलमध्ये एकच खळबळ उडाली होती. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासनेंच्या प्रचारार्थ CM शिंदे पुण्यात
पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. एकनाथ शिंदे हे कसबा मतदार संघातील व्यापारी, गणेश मंडळ आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यासोबत बैठक घेणार आहे. फडके हौद येथील गुजराती हायस्कूल येथे ४ वाजता ही बैठक होणार आहे. तसेच २४ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो होण्याची शक्यता आहे.
देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर