Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर|LIVE Marathi News Updates Maharashtra Breaking News LIVE Marathi latest news Marathi Breaking News Mumbai live Updates Latest Marathi News Headlines Marathi News Headlines | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

television channels

Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

किरीट सोमय्या प्रकरणी वृत्त वाहिनीला प्रेक्षपण बंद ठेवण्याचा माहिती प्रसारण मंत्रालयाचा आदेश

किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडिओ समोर आणल्याप्रकरणी एका मराठी वृत्त वाहिनीला माहिती प्रचारण मंत्रालयाने शिक्षा सुनावली आहे. वाहिनीला ७२ तास प्रक्षेपण बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.

चंद्राबाबूंना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना मोठा धक्का बसला आहे. स्कील डेव्हलपमेंट घोटाळ्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यास उच्च न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे.

भाजप खासदाराविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणा; सुप्रीया सुळेंची मागणी

लोकसभेत भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी बसपा नेते दानिश अली यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा सचिव प्रमुखांना पत्र लिहिले आहे. रमेश बिधुरी यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी दानिश अली यांची घेतली भेट

भाजप खासदाराने बसपा खासदार दानिश अली यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकारण तापलं आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दानिश अली यांची भेट घेतली. नफरत की दुकान आता संसदेमध्ये सुरु झाली आहे, अशी टीका त्यांनी केली.

विदर्भासह कोकणातील काही भागात पावसाला सुरुवात

येत्या ४८ तासांत मान्सून सक्रिय होणार असल्याची माहिती आहे. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. रायगड आणि पुण्यामध्येही पावसाला सुरुवात झालीये.

रमेश बिधुरी यांना भाजपकडून कारणे दाखवा नोटीस

भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी लोकसभेत बसपा खासदार दानिश अली यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याने भाजपकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे

अपमान झाल्याने खासदारकी सोडण्याची तयारी...दानिश अली यांचे वक्तव्य

दानिश अली यांना माध्यमांशी बोलताना रडू कोसळले. त्यांना प्रतिक्रिया देणे देखील जड जात होते. ते म्हणाले की, लोकसभेत अपमान झाल्यामुळे मला रात्रभर झोप आली नाही. भाजप खासदार बिधुरी यांच्याविरोधात कारवाई झाली नाही तर मी खासदारकीही सोडण्याचा विचार करु शकतो, असं ते म्हणाले आहेत.

आमदार अपात्रता प्रकरणी २५ सप्टेंबरला सुनावणी

आमदार अपात्रता प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.

भाजप-जेडीएस युतीची अधिकृत घोषणा

राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये जनता दल सेक्युलर पक्षाचा समावेश झाल्याचं भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी जाहीर केलं. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. 

ओशिवरा येथे आगीची घटना, अनेक लोक अडकल्याची भीती

मुंबई पश्चिम उपनगरातील ओशिवरा येथे आगीची दुर्घटना घडली आहे ओशिवरा परिसरातील हिरा पन्ना मॉल च्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत काही लोक अडकल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे

Pune News:  पुण्यातील काही भागात पावसाला सुरुवात

पुण्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी तुरळक सरी पडत आहेत.

श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोहित पवार यांची जाहीर सभा

श्रीकांत शिंदेंच्या कल्याणमध्ये आमदार रोहित पवार यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेसाठी रोहित पवार लोकलमध्ये बसून कल्याणला निघाले आहेत. कल्याणच्या स्प्रिंग टाईम हॉटेलमध्ये सायंकाळी साडेचार वाजता त्यांची जाहीर सभा आहे.

प्रज्ञान रोव्हरला जागे करण्याचा दिवस पुढे ढकलण्यात आला, इस्त्रोची माहिती

प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरला २३ सप्टेंबरला अॅक्टिव करण्याचा निर्णय इस्त्रोने घेतला आहे. इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार काही तांत्रिक कारणामुळे आजच्या ऐवजी उद्या प्रज्ञान रोव्हरला अॅक्टिव करण्यात येईल.

म. प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.

देशात हुकुमशाही सुरू आहे, शिवशाही आणायची आहे- आदित्य ठाकरे

देशात हुकुमशाही सुरू आहे, शिवशाही आणायची आहे. जे म्हणतात आमचं सरकार हिंदुत्त्वाचं आहे असं म्हणातात, ते सरकार वारकऱ्यांवर लाठीचार्ज करतात, हे यांचं हिंदुत्त्वाचं सरकार आहे का असा सवाल आदित्य ठाकरे यांनी मध्यप्रदेशमध्ये बोलताना म्हणालेत.

जातीनिहाय जनगणनेपासून लक्ष हटवलं जातंय; राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

जातीनिहाय जनगणनेपासून लक्ष हटवलं जातंय, त्याचबरोबर मोदी सरकार ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष करत आहे. महिला आरक्षणाचं स्वाहत पण, ओबीसी समाजाचं काय? असा सवाल उपस्थित करत खासदार राहुल गांधी यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या मुंबई दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. अमित शाह लालबागच्या राजच्या दर्शनासाठी जाणार आहेत.

दिल्लीत घडामोडींना वेग! राष्ट्रवादीच्या आमदार अपात्र याचिकांवर प्रक्रिया सुरू

दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीच्या आमदार अपात्र याचिकांवर प्रक्रिया सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या विधान परिषदेतील आमदार अपात्र याचिकेवर प्रक्रिया सुरू झाली आहे. सतिश चव्हाण, अमोल मिटकरी, विक्रम काळे, अनिकेत तटकरे विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या मुख्यालयात दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या मुख्यालयात दाखल दाखल झाले आहेत. महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याबद्दल भाजप महिला मोर्चाकडून मोदींचं आभिनंदन करण्यात येत आहे.

'निर्णयासाठी विधानसभा अध्यक्षांना दिल्लीत भाजप कार्यलयात जावं लागतंय', ठाकरे गटाच्या खासदाराचा हल्लाबोल

निर्णयासाठी विधानसभा अध्यक्षांना दिल्लीत भाजप कार्यलयात जावं लागतंय असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आमदार अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे.

संसदेच्या कामकाजाचं एक दिवस आधीच वाजल सुप

संसदेच 5 दिवसांचं विशेष अधिवेशन एक दिवस आधीच उरकलं असल्याची चर्चा सुरू आहे. राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक पारित झाल्यानंतर राज्यसभेच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. लोकसभेत पंतप्रधान मोदी यांनी चंद्रयान 3 च्या सफलतेबद्दल भाषण केल्यानंतर लोकसभा देखील अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं आहे. नारी शक्ती वंदन विधेयक सोडता अधिवेशनात कुठलंही विधेयक पारित केलेलं नाही.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर