
Marathi News Updates : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स, जाणून घ्या एका क्लिकवर
गायिका आशा भोसले मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल
बॉलिबुडच्या महान गायिका आशा भोसले या मुख्यमंत्र्यांच्या घरी दाखल झाल्या आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचं दर्शन घेतलय.
जम्मू-काश्मिरमधील गुलमर्ग येथे पहिली हिमवर्षा
जम्मू-काश्मिरच्या गुलमर्ग येथे हंगामातील पहिली हिमवर्षा झाली आहे, त्यानंतर परिसराचे सौंदर्य वाढले आहे.
पाली-खोपोली महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
गणेसोत्सवासाठी कोकणात गेलेल्या चाकरमान्यांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. मात्र, त्यांच्या परतीच्या प्रवासाला विघ्न लागलं आहे. पाली- खोपोली महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी बघायला मिळतेय.
अरुणाचल प्रदेशसाठी आज ऐतिहासिक दिवस- ज्योतिरादित्य शिंदे
अरुणाचल प्रदेशमध्ये तेझू विमानतळाचे उद्घाटन आज करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की अरुणाचल प्रदेशसाठी आज ऐतिहासिक दिवस आहे.
योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर MotoGP स्पर्धेसाठी नोयडा येथे दाखल
उत्तरप्रदेशच्या नोयडा येथे मोटो-ग्रँड प्रिक्स स्पर्धेचं आयोजन कऱण्यात आलंय. यावेळी योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी स्पर्धेला हजेरी लावली.
माजी आमदार रमेश कदम यांचं सोलापूरात जंगी स्वागत
माजी आमदार रमेश कदम यांचं सोलापुरमध्ये जंगी स्वागत कऱण्यात आलय. तुरुंगातून सुटून आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप, महिला आरक्षण लागू करण्यात भाजप निर्माण करतय अडथळा
कर्नाटकचे मुख्यमंत्री के सिद्दरामय्या म्हणाले की भारतीय जनता पक्षाने सीमांकनाचा मुद्दा पुढे आणत महिलांसह देशाची फसवणूक केली आहे.
विषारी दारु पिल्याने दोन जणांचा मृत्यू, ३ जणांना गमवावी लागली दृष्टी
बिहारच्या मुजफ्फरनगरमध्ये विषारी दारु पिल्याने दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर ३ जणांना आपली दृष्टी गमवावी लागली आहे. पोलिसांनी आतापर्यंत २ जणांना अटक केली आहे.
नाना पटोले पोहचले लालबागच्या राजाच्या दर्शनाला
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले मुंबईच्या लालबागचा राजाच्या दर्शनाला पोहचले. येथे त्यांना गणपती बाप्पाचे दर्शन घेत गणेशोत्सवात सहभाग घेतला.
राघव- परिणीतीच्या लग्नासाठी सानिया मिर्झा, मनीष मल्होत्रा राजस्थानच्या उदयपूरमध्ये दाखल
टेनिसपटू सानिया मिर्झा आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा राजस्थानच्या उदयपूरमध्ये पोहोचले आहेत. खासदार राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा आज लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत, या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज उदयपूरमध्ये दाखल होत आहेत.
तामिळनाडूतील मदुराईमध्ये एका कार्यक्रमात बॅरिकेड कोसळलं, अनेक जखमी
तामिळनाडूमधील मदुराईच्या अण्णा नगर भागात एका कार्यक्रमात बॅरिकेड कोसळल्याने अनेक जण जखमी झाले.
PM मोदी आज नऊ वंदे भारत ट्रेन्सना दाखवणार हिरवा झेंडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 9 वंदे भारत ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या नऊ ट्रेन राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरात या अकरा राज्यांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवतील.
नागपूरमध्ये अंबाझरी परिसरात फडणवीसांकडून परिस्थितीची पाहणी
राज्याचे उपमुख्यमंत्री आज नागपूर दौऱ्यावर आहेत, यादम्यान फडणवीसांनी शहरातील अंबाझरी परिसरात पूरामुळे झालेल्या नुकसाणीची पाहणी केली. नागपूरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पूर आला होता. या पावसात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आशियाई स्पर्धेत भारताचं खातं उघडलं
चीनमध्ये सुरू झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने पदकांचं खातं उघडले आहे. या स्पर्धेत भारताने तीन पदके जिंकली आहेत. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत दोन रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले आहे. रोइंग संघाने एक रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले आहे, तर एअर रायफल संघाने देशासाठी एक रौप्य पदक जिंकले आहे.