LIVE Update : रवींद्र धंगेकर यांचे उपोषण मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

esakal Breaking News

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

नक्षलवाद्यांच्या गोळीबारात जवान शहीद

छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात भारतीय लष्कराचा एक जवान नक्षलवाद्यांच्या गोळीबारात शहीद झाला आहे. मोतीराम अंचला असं जवानाचं नाव आहे.

शेगावच्या गंगामाई साखर कारखान्याला आग

नगर जिल्ह्यातल्या शेगावच्या गंगामाई साखर कारखान्याला आग लागल्याची घटना घडली आहे. इथेनॉलच्या प्लांटने पेट घेतल्याची माहिती मिळत आहे.

पैसे वाटणे ही भाजपची संस्कृती नाही- देवेंद्र फडणवीस

पैसे वाटणे ही भाजपची संस्कृती नाही. आम्ही निवडणूक पराभूत होवो किंवा जिंको आम्ही कधीही पैसे वाटत नाही.म्हणूनच लोक आम्हाला वारंवार जिंकून देतात. कसबा आणि चिंचवडमध्ये आम्ही जिंकणार आहोत हे लक्षात आल्यामुळे रडीचा डाव सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आतंकवादी बनण्यासाठी निघालेल्या दोघांना पोलिसांना घेतलं ताब्यात

दिल्लीमध्ये लालकिल्ल्याजवळ पोलिसांना दोघांना ताब्यात घेतलं आहे. खालिद आणि अब्दुल्ला असं या तरुणांचं नाव असून ते ट्रेनिंगसाठी काश्मीरवरुन पाकिस्तानला जाणार होते.या दोघांकडून शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत.

भाजपचं शिष्टमंडळ पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत भाजपचं एक शिष्टमंडळ पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात पोहोचलं आहे.

केंद्रीय मंत्री निसिथ प्रामाणिकांच्या ताफ्यावर दगडफेक

केंद्रीय मंत्री निसिथ प्रामाणिकांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पश्चिम बंगालच्या कूचबिहारच्या दिनहाटा भागात ही घटना घडली असून, निसिथ पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी निघाले होते. त्यावेळी हा हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान, जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.

रवींद्र धंगेकर यांचे उपोषण मागे

कसबा मतदार संघात मतदारांनी मतांसाठी पैसे घेतले असा आरोप काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला. त्यानंतर त्यांनी उपोषण केलं होतं. रवींद्र धंगेकर यांचे उपोषण मागे घेतलं

धंगेकरांचे आरोप बिनबुडाचे; भाजप शहराध्यक्षांचा हल्लाबोल

कसबा मतदार संघात मतदारांनी मतांसाठी पैसे घेतले असा आरोप काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला. हा कसब्यातील सगळ्या मतदारांचा अपमान आहे, हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत, अशी प्रतिक्रिया पुणे शहर भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला आहे. असे खोटे आरोप भाजपच्या उमेदवारावर करुन फक्त सहानुभूती निर्माण करण्याचं काम ते करत असल्याचंही मुळीक म्हणाले आहेत.

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन पोलीस शहीद

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन पोलीस शहीद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री ब्लॉक! 'या' लोकल रद्द

मध्य रेल्वेच्या नाहुर आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दोन गर्डर टाकण्याच्या कामासाठी शनिवारी (ता. २५) रात्री तीन तासांचा पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सहाही मार्गिकांवर असणार असल्याने लोकलसह मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे; तर २७ फेब्रुवारीपासून सीएसएमटी आणि ठाणे दरम्यानही रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

हसन मुश्रीफांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर; संतप्त कार्यकर्त्यांचा पोलिस ठाण्यात

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांची 40 कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली कागल तालुक्यामध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. सुडबुद्धीतून गुन्हा दाखल केल्याचा आरोप मुश्रीफ यांच्या समर्थकांनी केला आहे. तर या षडयंत्रामुळे कोल्हापुरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहिल असा इशाराही मुश्रीफ यांच्या समर्थकांनी दिला आहे.


देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर