दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
esakal Breaking News
esakal Breaking News

भाजपकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरु आहे- आदित्य ठाकरे

सध्या भाजपकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरु आहे

बीडीडी चाळीचं स्वप्न खऱ्या अर्थाने मविआ सरकारने पूर्ण केलं

हे सरकार गद्दारांचं सरकार असून ते कोसळणार आहे

गद्दारांना वापरलं जातंय, हे त्यांना कळालेलंच नाही

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना मद्य घोटाळ्यामध्ये अटक

विरोधी पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी- फडणवीस

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षाच्या सुरक्षेवरुन प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र विरोधी पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे. संजय राऊत प्रकरणामध्ये 'सामना'च्या उपसंपादकाने तसं बोललो नसल्याचं स्पष्ट केलं होतं. परंतु नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करणं चूक असल्याचं फडणवीस म्हणाले.

कसब्यात ५ वाजेपर्यंत ४५.२५ टक्के मतदान

आजारी असताना सुद्धा बापट यांनी केलं मतदान

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी केले मतदान

आज कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे

आजारी असताना सुद्धा बापट यांनी मतदानाला हजेरी लावली

यासाठी आज संध्याकाळी अहिल्यादेवी शाळेत बापट यांनी पोहचून मतदान केले

गिरीश बापट मतदानासाठी मतदान केंद्रावर दाखल

गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के

गुजरातच्या राजकोटमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. आज दि. 26 फेब्रुवारी रोजी 4.3 तीव्रतेचा भूकंप झाला.

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत दुपारपर्यंत ३० टक्के मतदान

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत दूपारपर्यंत ३० टक्के मतदान

कसब्यात ३० टक्के तर चिंचवडमध्ये ३०.५५ टक्के मतदान

शेवटच्या टप्प्यात मतदान वाढण्याची शक्यता

चिंचवड पोटनिवडणुकीत मतदान केंद्रात मतदाराकडून व्हिडिओ चित्रण

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार समोर आला आहे. चिंचवड पोटनिवडणूकित चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मतदान केंद्रात मोबाईल वापरास परवानगी नसताना व्हिडीओ चित्रण होतेच कसे? असा सवाल उपस्थित होत आहे. मतदान केंद्रावरील अधिकारी तपासणी का करत नाहीत? असे प्रश्न नेत्यांकडून केले जात आहे.

शैलेश टिळक, कुणाल टिळक यांच्यासह घरातील सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क

शैलेश टिळक, कुणाल टिळक यासह घरातील इतर जणांनी आज कसबा पोटनिवडणुकी चा हक्क बजावला

दरवर्षी मतदान करत होतो, या वर्षी ही केले आहे पण दरवर्षी मुक्ता बरोबर यायचो निवडणुकीला आज ती उणीव भासत आहे अशी भावना व्यक्त करताना शैलेश टिळक भावूक

मला खात्री आहे की भाजप कसबा पोटनिवडणूक नक्की जिंकेल, शैलेश टिळक यांनी दर्शवला विश्वास

चिंचवड मतदारसंघांत पहिल्या चार तासात अर्थात ११ वाजेपर्यंत १०.४५ टक्के मतदान

चिंचवड विधानसभा मतदारसंघात आज रविवार २६ फेब्रुवारी रोजी मतदान सुरु आहे. या मतदार संघामध्ये एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार असून ५१० मतदार केंद्रावर मतदान होत आहे. सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत झालेल्या चार तासांत एकूण १०.४५ टक्के मतदान झाले. पहिल्या दोन तासात अर्थात सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत ३.५२ टक्के मतदान झाले होते.

गंजपेठेत भाजपाच्या माजी नगरसेवकाचा मतदारावर हल्ला

कसबा पोटनिवडणुकीमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. अशातच भाजपाच्या माजी नगरसेवकाने हल्ला केल्याचा आरोप एका मतदाराने केला आहे. गंजपेठेमध्ये हा प्रकार घडला असून, अद्याप याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

रूपाली ठोंबरे पाटील यांनी केला गोपनीयतेचा भंग; निवडणूक आयोग कारवाई करणार?

कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी स्वतःचा मतदानाचा हक्क बजावताना ईव्हीएम मशीनचा फोटो काढून गोपनीयतेचा भंग केला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग या प्रकरणाची गंभीर दखल घेणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

कसबा पोटनिवडणुकीसाठी ही तरुणी लंडनहून थेट पुण्यात

मतदान हा आपला अधिकार आणि तो हक्क आहे सगळ्यांनी तो केलाच पाहिजे, अशी भूमिका पुढे घेऊन जात अमृता देवकर ही तरुणी थेट लंडनहून आज पुण्यात पोहचली. तब्बल १२ तासाहून अधिक प्रवास करून आलेल्या अमृता यांनी पुण्यात येताच थेट मतदान केंद्र गाठलं आणि मतदानाचा हक्क बजावला आहे

कसबा विधानसभा मतदारसंघात सकाळच्या सत्रात ६ टक्के इतके मतदान

कसबा विधानसभा मतदारसंघात सकाळच्या सत्रात ६ टक्के इतके मतदान पार पडले आहे. सकाळी ९.३४ पर्यंत कसबा मध्ये ६.५ टक्के मतदान पार पडले. दुसऱ्या बाजूला, चिंचवडमध्ये सकाळी ९.३४ पर्यंत ३.५२ टक्के मतदान झाले आहे.

255 मतदान केंद्रावर वेबकास्टींग

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील 255 मतदान केंद्रावर वेबकास्टींगच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख हे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून तर निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन मधील नियंत्रण कक्षातून संपूर्ण मतदान प्रक्रीयेवर लक्ष ठेवून आहेत

प्रमुख उमेदवारांचे कुटुंबीयांसह मतदान

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू विजय जगताप आणि शंकर जगताप यांच्यासह भाजप उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप व त्यांची कन्या ऐश्वर्या यांनी माध्यमिक विद्यालय पिंपळे गुरवमध्ये मतदान केंद्र क्रमांक 348 येथे मतदान केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पिंपळे सौदागर येथे मतदान केले. दरम्यान, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे व पदाधिकाऱ्यांनी मतदान केंद्रास भेट दिली.

चिंचवड मतदारसंघांत पहिल्या दोन तासात ३.५२ टक्के मतदान

चिंचवड विधानसभा मतदारसंघात आज रविवार २६ फेब्रुवारी रोजी मतदान सुरु आहे. या मतदार संघामध्ये एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार असून ५१० मतदार केंद्रावर मतदान होत आहे. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत अर्थात मतदानाच्या पहिल्या दोन तासात ३.५२ टक्के मतदान झाले.

सागर अंघोळकर आणि राहूल कलाटे  यांच्या समर्थकांमध्ये राडा

चिंचवडमध्ये मतदानावेळी राडा, पिंपळे गुरव मतदान केंद्रावर घडलेला प्रकार. सागर अंघोळकर आणि राहुल कलाटे यांच्या समर्थकांमध्ये राडा

लक्ष्मण जगताप यांच्या मुलांचं पहिलंच मतदान आईसाठी

पुणे जिल्ह्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. तर या निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांच्या मुलाने त्याचं पहिलं मतदान आईसाठी केलं आहे.

चिंचवडचे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटेंनी बजावला मतदानाचा हक्क

चिंचवडचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

मतदानापूर्वी भाजपचे उमेदवार हेमंत रासनें यांनी घेतलं दगडूशेठ गणपतीचे दर्शन

मतदान करण्यापूर्वी कसबा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी दगडूशेठ मंदीरात गणपतीची आरती करुन दर्शन घेतलं. यावेळी बोलताना त्यांनी निवडणुकीत विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात

पुणे जिल्ह्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीमुळे दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पुण्यात आले होते. भाजपने या निवडणुकीसाठी मोठी ताकद लावली होती. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचार केला होता. तर, आज मतदार राजा कोणाच्या पारड्यात मतदान टाकणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. त्याचबरोबर देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com