LIVE Update : पुण्यातील कारखान्याला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

पुण्यात मुंढवा, केशवनगर भागात पावसाला सुरुवात

मुंढवा, केशवनगर, खराडी परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे

कोकणातील माणसांनी 'हे' कसं कळलं नाही- राज ठाकरे

राज ठाकरे म्हणाले, कोकणातील माणसांचे मला काहीच कळत नाही. तुमच्या जमिनी कोणीतरी विकत घेताहेत हे लक्षात कसे येत नाही. बाहेरुन माणसं येतात आणि ते प्रकल्पाची सुरुवात करतात. नाणारनंतर बारसूचे नाव आले. तुम्हाला हे कळलं कसं नाही. तुमच्या जमिनी विकल्या गेल्या हे कसं?

आपली जमीन गेली हे कसं कळत नाही. कवडीमोल भाव देऊन तुमच्या जमिनी घेतात आणि मोठ्या भावानं सरकारला विकतात. कोकणासारखा प्रतिभासंपन्न भाग पण त्याची अवस्था बिकट झाली आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

काही जणांना माझ्यावर टीका केल्याशिवाय भाकर मिळत नाही- उद्धव ठाकरे

महाडमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेला सुरुवात झाली आहे

अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी कोकणासाठी काय केलं? - राणे

काय म्हणाले नारायण राणे?

 • शिवसेनेची अवस्था आज कमी तकादीचा कमी संख्या असलेला पक्ष आहे

 • मुख्यमंत्री असतांना उद्धव ठाकरे दोनदा मंत्रालयात गेले

 • आता मात्र पेटवण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये फिरत आहेत

 • शिवसेनेने कोकणात कायम विकासकामांना विरोध केला

 • अडीच वर्षात त्यांनी कोणताच प्रकल्प कोकणात आणला नाही

 • उद्धव ठाकरेंचं कोकणाच्या विकासात अजिबात योगदान नाही

 • जैतापूरच्या विरोधासाठी ५०० कोटींचा डील झाली होती

 • त्यांनी कोळश्याच्या उद्योगपतींकडून ५०० कोटी घेतले होते

 • संजय राऊत म्हणाले वाटणी झाली होती

 • राऊत दारु पिल्यासारखं काहीही बोलत आहेत

 • सध्या ठाकरे-राऊत डिप्रेशनमध्ये गेले आहेत

 • उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासत एकमेव निकामी मुख्यमंत्री

 • खोक्यांचं काय बोलता 'मातोश्री'मध्ये काय चालतं आम्हांला माहिती आहे


वारजे रामनगर येथे गादिच्या कारखान्याला आग

पुण्यातल्या वारजे रामनगर येथे गादिच्या कारखान्याला आग लागल्याची घटना घडली आहे.

अग्निशमन दलाची तीन वाहने दाखल झाली असून धुराचे लोट दिसत आहेत

पुण्यातील वेताळ टेकडीला आदित्य ठाकरेंनी भेट दिली

ब्रिटनचे किंग चार्ल्स यांचा राज्याभिषेक सोहळा

ब्रिटनचे किंग चार्ल्स यांचा राज्याभिषेक सोहळा सुरू आहे.

पर्यावरणाची हानी होणार असेल तर प्रकल्प नको - उद्धव ठाकरे

पर्यावरणाची हानी होणार असेल तर प्रकल्प नको असं उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे. बारसूमधील प्रस्तावित रिफायनरीला स्थानिकांचा विरोध असेल तर आम्ही देखील विरोध करू असं उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे. बारसूबाबत दिशाभूल करण्यात आली आहे. वादग्रस्त प्रकल्प कोकणात नको. सरकारकडून दडपशाही सुरु असल्याचंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

शरद पवार बारामतीतील गोविंद बाग या घरी दाखल झाले.

अजित पवार अचानक दौंडमधून कर्जतकडे रवाना

अजित पवार अचानक दौंडमधून कर्जतकडे रवाना झाले आहेत. दौंडमधील PDCC बॅकेचा उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द, कारण अस्पष्ट.

रिफायनरी समर्थनासाठी भाजप-शिवसेनेचं आंदोलन

राजापूरमध्ये आज रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चा निघाला आहे. या मोर्चामध्ये नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे, प्रमोद जठार हजर आहेत. यावेळी रिफायनरीसाठी असलेले समर्थन दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बारसू गावाला भेट देणार आहेत. बारसू दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.

कातळशिल्प परिसरात गोंधळ 

उद्धव ठाकरे आज बारसू दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कातळशिल्पाची पाहणी केली. त्यानंतर आता या परिसरात गोंधळाची परिस्थिति निर्माण झाली आहे.

रत्नागिरीच्या सभेला येणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांच्या गाडीचा अपघात

आज राज ठाकरे यांची रत्नागिरीमध्ये सभा आहे. रत्नागिरीमधील सभेला जात असताना मनसे कार्यकर्त्यांच्या गाडीचा भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये एका मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घटना घडली आहे. देवा साळवी असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे. ते दहीसर मनसेचे  उपाध्यक्ष होते. या अपघातामध्ये अन्य तिघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

माथेरान - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा माथेरान दौरा

माथेरान - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी माथेरान दौरा केला. अमन लॉज ते माथेरान असा माथेरान फुलराणीतुन प्रवास केला. शिवसैनिकांची गर्दी तर पर्यटकांनी पर्यटकांनी पाहण्याकरता गर्दी केली आहे.

संजय राऊत यांचं नारायण राणे यांना आव्हान

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची खिल्ली उडवली आहे. येऊ देणार नाही म्हणजे काय? तुमच्या या पोकळ धमक्या बंद करा, उद्धव ठाकरे हे कोणत्याही क्षणी बारसूत उतरतील. त्यांना रोखून तर दाखवाच, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं आहे.

पुण्यातील वाघोली भागात गोडाऊनला भीषण आग; तीन जणांचा मृत्यू

शहरातील वाघोली भागात काल (शुक्रवारी) रात्री ११.४५ वाजता उबाळे नगर येथे आगीची घटना घडली. “शुभ सजावट” या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत ४ सिलेंडर फुटलेत. आगीची घटना समजताच त्वरीत पुणे येथील अग्नीशमन दलाच्या ५ तर पीएमआरडीए ४ अशी एकूण ९ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली.


सविस्तर बातमी येथे वाचा - Pune Fire News: पुण्यातील वाघोली भागात गोडाऊनला भीषण आग; तीन जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरे यांचा आज बारसू दौरा; रिफायनरी विरोधकांची घेणार भेट

उद्धव ठाकरे आज (6 मे) रत्नागिरीतील बारसू गावाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्धव ठाकरे इथे रिफायनरी विरोधक तसंच समर्थकांची भेट घेणार आहेत.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर