दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी नेते सरसावले

मणिपूरमध्ये मागील काही दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. दरम्यान येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुध्वणीवरून संपर्क साधला आणि मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरुप परत आणण्याची विनंती केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांची फोनवरून चौकशी केली.

शरद पवार यांनी घेतलं विठ्ठलाचं दर्शन

नियोजित कार्यक्रमामुळे पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हतो- अजित पवार

राजीनाम्याचा विषय संपला असल्याने आम्ही कामाला सुरुवात केली आहे. पत्रकार परिषद झाली त्या दिवशी मी माझ्या नियोजित कार्यक्रमामुळे हजर राहू शकलो नाही. महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांच्याच आदेशामुळे पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलो नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं, त्यामुळे पुन्हा वेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

शरद पवार अनेक वेळा शिवरायांच नाव घेतात - छगन भुजबळ

शरद पवार नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात, असे म्हणत छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे.

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार येईल; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार येईल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. देशभरात भाजपची घसरण सुरू असल्याचंही पवार म्हणालेत. कर्नाटकातील जनता भाजपवर नाराज असल्याचंही ते म्हणालेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनाबाह्य मुख्यमंत्री - आदित्य ठाकरे 

50 खोके कर्नाटकात प्रचाराला गेले

खुर्ची वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रचाराला गेलेत

सरकारला जनतेचा आवाज ऐकू येत नाही

"महाराष्ट्रात पुन्हा भूकंप होणार, संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार’’

संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंसोबत राहण्यात कुठलाही रस नसून संजय राऊत हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. संजय राऊत यांच्याबाबत बोलताना नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला असं कळवलंय की, आता काय उद्धव ठाकरेंचं खरं नाही. त्यांचा पक्ष राहिलेला नाही. आता ते मला खासदार बनवू शकत नाहीत. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंसोबत राहण्यात अर्थ राहिलेला नाही. म्हणून माझा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घ्या.

एमआरएफ मोग्रीप राष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार

एमआरएफ मोग्रीप राष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार ठक्कर मैदान येथे पार पडला यावेळी देशभरातील स्पर्धक सहभागी झाले आहेत.

पुण्यातील धोकादायक वास्तूंचे होणार ऑडिट

पुण्यातील धोकादायक वास्तूंचे ऑडिट निघणार आहे. शहर आणि जिल्ह्यातील धोकादायक इमारतींचे ऑडिट करा. मान्सून पूर्व आढावा बैठकीत जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आदेश दिला आहे. धोकादायक इमारती, पूल आणि जुन्या वाड्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्सूनपूर्व बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येणार आहे. वेळ आहे तोपर्यंत मान्सूनपूर्व कामे करून घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश दिले आहेत.

साताऱ्यात कोयना परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के 

साताऱ्यात कोयना परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. पहाटे 3 वाजून 45 मिनिटांनी हे धक्के बसले आहेत.

शरद पवार सोलापूर दौऱ्यावर, पंढरपुरात दाखल

आज मध्य, पश्चिम आणि हार्बरवर मेगाब्लॉक नाही

रविवारी ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक आहे, तर मध्य पश्चिम आणि हार्बर मार्गावर कुठलाही मेगाब्लॉक नसणार आहे. त्यामुळे या रविवारी रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना दिलासा देण्यात आला आहे.

कर्नाटकात आज प्रचाराचा धुरळा; मोदी-शाहांना राहुल-प्रियांकाची टक्कर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. यापार्श्वभूमीवर आज कर्नाटकात राजकीय धुरळा उडणार आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा प्रचारासाठी रिंगणात असणार आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही काँग्रेसकडून जोरदार प्रचार करताना दिसणार आहेत.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com