Marathi News Update : शरद पवारांना धमकी ते बिपरजॉय चक्रीवादळाच्या अपडेट, एका क्लिकवर वाचा...

biperjoy
biperjoylatur

बिपरजॉय चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद

गुजरात: बिपरजॉय चक्रीवादळाच्या आधी वलसाडच्या अरबी समुद्राच्या किनार्‍यावरील तिथल समुद्रकिनाऱ्यावर उंच लाटा दिसत आहेत.

बिपरजॉय चक्रीवादळाच्या इशाऱ्यानंतर वलसाड प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तिथल समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद केला होता.

भाजप नेत्यांच्या कार्यक्रमा दरम्यान वादळी वाऱ्याने मंडप कोसळला

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे भाजपा वतीने मोदींच्या विकासासार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या दरम्यान या कार्यक्रमाला भाजपा खासदार अनिल बोंडे,आमदार नितेश राणे, आमदार प्रवीण पोटे सह भाजप नेते उपस्थित होते मात्र अचानक सुसाट वारा आला त्यामुळे हवेने पूर्णपणे मंडप खाली कोसळला या मंडपखालून नितेश राणे,अनिल बोडे सह भाजपा नेत्यांना यावेळी सुखरूप बाहेर काढण्यात आले,मात्र या ठिकाणी मोठी घटना टळली या दरम्यान मंडप खाली कोसळला असल्याने मोठा गोंधळ उडाला होता

केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतला अमरनाथ यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिल्लीत एका उच्चस्तरीय बैठकीत अमरनाथ यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला आणि अमरनाथ यात्रेकरूंना आरामदायी दर्शन मिळावे आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, ही नरेंद्र मोदी सरकारची प्राथमिकता असल्याचे सांगितले.

संजय राऊत यांना आलेल्या धमकीवर शरद पवार यांची प्रतिक्रिया

या राज्यातील प्रत्येक नागरिकाला राज्यघटनेनुसार कोणत्याही पक्षाबाबत आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, त्यामुळे धमक्या देऊन आवाज बंद करू शकतो, असे कोणाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्या व्यवस्थेवर आणि क्षमतेवर माझा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे मला त्याची चिंता नाही- शरद पवार

संजय राऊत धमकीप्रकरणी दोघेजण पोलिसांच्या ताब्यात

संजय राऊत आणि सुनिल राऊत धमकीप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

शरद पवारांना धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी देणाऱ्यावर कलम ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने ही माहिती दिली आहे.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर मोठा अपघात झाला आहे. यामध्ये तिन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. मुंबईवरुन नागपूरकडे जाताना हा अपघात झाला आहे. जालन्यातील निधोना गावाजवळ हा अपघात झाला आहे. कारने कंटेनरला मागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे.

मीरा रोड हत्याकांड अपडेट : आरोपीची आज चौकशी होणार

३२ वर्षीय लिव्ह-इन पार्टनर सरस्वती वैद्य हिच्या कथित हत्येप्रकरणी आरोपी मनोज साने याला आज नयानगर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. नयानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी त्याची चौकशी करत आहेत. मृत पीडितेची बहीणही पोलिस ठाण्यात आली आहे.

शरद पवारांना जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

शरद पवारांना जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी बोलताना अजित पवार म्हणाले की, शरद पवार यांना सौरभ पिंपळकर या ट्विटर अकाउंटवरून धमकी देण्यात आली, त्याच्या बायोमध्ये मी भाजपचा कार्यकर्ता आहे असा उल्लेख आहे. त्यांच्या पक्षाने असं बोलायला सांगितलं आहे का? विचाराची लढाई विचाराने करूया ना. प्रत्येकाला मतस्वतंत्र्य आहे.याचा गैरवापर कशाला करायचा? माझं म्हणणं असं आहे की, राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात कोण मास्टर माइंड आहे? त्याच्या मोबाईल नंबर घेऊन त्याचा कोणाशी संपर्क आला हे कळलं पाहिजे असे अजित पवार म्हणाले.

मीरा रोड हत्याकांड अपडेट : आरोपीला नयानगर पोलिस ठाण्यात आणण्यात आले

मीरा रोड हत्याकांड : आरोपी मनोज सानेला चौकशीसाठी नयानगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एका फ्लॅटमधून त्याच्या लिव्ह-इन पार्टनरचे चिरलेले आणि उकळलेले शरीराचे अवयव सापडल्यानंतर सानेला अटक करण्यात आली होती.

धमकीनंतर शरद पवारांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ!

ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातील मोदीबाग या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. स्थानिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तसेच पुण्यातील कार्यालयात काही वरिष्ठ पोलिस आधिकारी शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.

निलेश राणेंविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; मुंबईत कर्यकर्त्यांचं आंदोलन

मुंबई : शरद पवार यांच्याबद्दल अक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी भाजप नेते निलेश राणे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबईत आझाद मैदान येथे कर्यकर्त्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात येत आहे.

 शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी! सुप्रिया सुळे पोलिस आयुक्तांच्या भेटीला

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीला दाखल झाल आहे. भाडखाउ तुझा दाभोळकर केला जाईल अशा स्वरूपाची धमकी ट्विटर द्वारे देण्यात आली आहे.

biperjoy
Sharad Pawar Death Threat : "मी भाजप कार्यकर्ता, सेक्युलॅरीजमचा हेट करतो!"; पवारांना धमकी देणारा पिंपळकर कोण?

कोल्हापुरात इंटरनेट सेवा पूर्ववत

कोल्हापुरात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमिवर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. सध्या कोल्हापुरात शांतता असून परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. यानंतर अखेर शहरातील पूर्ववत करण्यात आली आहे. गेल्या ३८ तासांपासून शहरातील इंटरनेट सेवा विस्कळीत होती.

'एक राज्य एक गणवेश' योजनेत बदल

राज्यातील सरकारने 'एक राज्य एक गणवेश' योजनेबाबत यूटर्न घेत मोठा निर्णय घेतला आहे. नव्या शैक्षणिक वर्षात पात्र विद्यार्थ्यांना दोन गणवेशाचा लाभ शाळा व्यवस्थापन समितीमार्फतच दिला जाणार आहे. तर 'एक राज्य एक गणवेश' ही योजना पुढील वर्षापासून लागू करण्यात येणार आहे.

कोल्हापूनंतर औरंगजेबाच्या स्टेटसवरून बीडमध्ये तणाव! 

कोल्हापूर पाठोबाठ बीड जिल्ह्यातील आष्टी शहकत देखील तणावाचं वाचावरण आहे. औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याने रात्रीपासून तणावाचे वातावरण असून पोलिसांनी रात्री उशीरा याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या आवाहनानंतर आष्टी येथे बंद पाळण्यात आला आहे.

 दिल्लीत नवजात बालकांच्या रुग्णालयाला आग! मोठा अनर्थ टळला

नवी दिल्लीतील वैशाली कॉलनी येथील नवजात बालकांच्या रुग्णालयात आग लागली. अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दिल्ली अग्निशमन दालाकडून सर्व 20 नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवले.

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स - देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com