KeralaFloods: महाराष्ट्राची वैद्यकीय टीम मदतीसाठी केरळमध्ये

मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

महाराष्ट्राची एक वैद्यकीय टीम मदतीसाठी केरळात पोहोचली आहे. त्यांनी लगेच वैद्यकीय तेथे वैद्यकीय मदतीच्या कामाला सुरवात केली आहे. केरळच्या विविध भागात तीन पथकामध्ये या टीमचे विभाजन करण्यात आले आहे.

मुंबई- महाराष्ट्राची एक वैद्यकीय टीम मदतीसाठी केरळात पोहोचली आहे. त्यांनी लगेच वैद्यकीय तेथे वैद्यकीय मदतीच्या कामाला सुरवात केली आहे. केरळच्या विविध भागात तीन पथकामध्ये या टीमचे विभाजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील मदतसामुग्री घेऊन निघालेले कोस्टगार्डचे जहाज सुद्धा कोचीत पोहोचले आहे. दरम्यान, केरळ राज्यात पावसाचे थैमान चालू असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशभरातून केरळमधील पूरग्रस्तांना मदत मिळत आहे. अनेक राज्यातून अन्न, कपडे, रोख रक्कम पुरवली जात आहे. त्या दष्टीकोनातूनच महाराष्ट्राकडूनही मदत पुरवली जात असतानाच महाराष्ट्राकडून केरळला वेैद्यकीय मदत पुरवण्यात आली आहे. 
 

केरळमध्ये लष्कराचे बचावकार्य जोरात सुरू असून, अनेक बेघर नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच पेटीएम व अॅमेझॉनवरून वस्तू व पैशांची मदत मागण्यात आली आहे. देशभरातून, तसेच काही इतर देशातूनही केरळ पूरग्रस्तांना मदत पुरवली जात आहे.

Web Title: Maharashtra Medical team reaches Kerala