महाराष्ट्रात आता पाईपद्वारे मिळणार गॅस!

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जुलै 2019

- पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाने देशातील एकूण 406 जिल्ह्यांमध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करण्यासाठी भौगोलिक क्षेत्रांना दिली परवानगी.

नवी दिल्ली :  पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाने देशातील एकूण 406 जिल्ह्यांमध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करण्यासाठी भौगोलिक क्षेत्रांना परवानगी दिली आहे. महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये अशी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पाईपद्वारे गॅस मिळणार आहे.

पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयाअंतर्गत कार्यरत पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळ हे देशातील विविध जिल्ह्यात पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करण्यासाठी भौगोलिक क्षेत्रांना परवानगी देते. या मंडळाने 10 व्या लिलाव फेरीपर्यंत महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांसह देशातील एकूण 406 जिल्ह्यांमध्ये भौगोलिक क्षेत्रांना परवानगी दिली आहे.

महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, रायगड ,पुणे ,रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, बृह्नमुंबई, पुणे शहरासह  पिंपरी चिंचवड आणि लगतचे हिंजवडी, चाकण, तळेगाव क्षेत्र, अहमदनगर, औरंगाबाद, लातूर , उस्मानाबाद, सांगली, सातारा,सिंधुदुर्ग, धुळे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करण्यासाठी भौगोलिक क्षेत्रांना परवानगी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती पेट्रोलियम व नैसर्गिक गॅसमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Maharashtra Natural Gas will get from Pipe Soon