मंत्र्यांच्या "आधार' कार्डाबाबत पंतप्रधान कार्यालय अनभिज्ञ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

मुंबई - भारतीयांना "आधार' कार्ड अनिवार्य करत ती माहिती सर्व सुविधांसाठी जोडण्याचे आवाहन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान कार्यालयाकडे त्यांच्याच मंत्र्यांची "आधार' कार्डाची माहिती नसल्याची बाब माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिलेल्या माहितीतून समोर आली आहे. एकप्रकारे सर्व मंत्र्यांनी मोदी यांच्या आवाहनाला ठेंगाच दाखविला आहे, असे गलगली यांनी सांगितले. 

गलगली यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे पंतप्रधानांसह मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी आपल्या "आधार' कार्डाची माहिती सादर केली असल्यास त्या मंत्र्यांच्या नावाची यादी मागितली होती. गलगली यांचा अर्ज मंत्रिमंडळ सचिवालय, लोकसभा सचिवालय, राज्यसभा सचिवालय, माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय, भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण अशा पाच ठिकाणी हस्तांतरित केला गेला. स्वतः पंतप्रधान आणि मंत्र्यांच्या "आधार' कार्डाची माहिती केंद्रीय शासनाकडे उपलब्ध असणे आवश्‍यक आहे. मात्र, पंतप्रधान कार्यालयाकडे मंत्र्यांची आधार कार्ड माहिती नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवाहनाकडे मंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत असल्याचे गलगली यांनी स्पष्ट केले. 

Web Title: maharashtra news aadhar card