राज्यात खरिपाच्या पेरण्यांना वेग 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

नाशिक - राज्यात जूनच्या सर्वसाधारणच्या 81.5 टक्के पाऊस झाला असून, खरिपाच्या पेरण्यांनी वेग पकडला आहे. आतापर्यंत 1 कोटी 48 लाख 90 हजार 100 हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी 18 हजार 58 हेक्‍टर म्हणजेच, 12.1 टक्के क्षेत्रावर पेरण्या उरकल्या आहेत. त्यात अन्नधान्याच्या 7, डाळींच्या 7.4, तेलबियांच्या 11, कापसाच्या 18.5 टक्के क्षेत्राचा समावेश आहे. 

विभागनिहाय जूनच्या सर्वसाधारण पर्जन्याच्या तुलनेत आतापर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी पुढीलप्रमाणे असून (कंसात गेल्यावर्षी आतापर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी.) ः कोकण- 81.6 (61.7), नाशिक- 111.6 (41.8), पुणे- 78.8 (62.2), औरंगाबाद- 99.4 (81.8), अमरावती- 85 (59.3), नागपूर- 37.2 (29.3). दरम्यान, भाताच्या लागवडीचा वेग गेल्यावर्षीच्या तुलनेत धीमा राहिला आहे. भाताची लागवड आतापर्यंत 1.4 टक्के क्षेत्रावर झाली असून, गेल्यावर्षी हीच लागवड 5 टक्‍क्‍यांपर्यंत पोचली होती. ज्वारीच्या पेरण्या 3.5 टक्के क्षेत्रावर झाल्या असून हा वेग गेल्यावर्षीच्या आसपास आहे. बाजरीचे क्षेत्र 8.3 टक्‍क्‍यांपर्यंत पोचले असून गेल्यावर्षी बाजरीची 7.7 टक्के पेरण्या झाल्या होत्या. 

विभागनिहाय खरिपाची पेरणी 
विभागाचे नाव पेरणी हेक्‍टरमध्ये पेरणीची टक्केवारी 
कोकण 0 0 
नाशिक 1711.02 7.6 
पुणे 286.12 2.4 
कोल्हापूर 1984.34 17.8 
औरंगाबाद 8543.81 42.9 
लातूर 5145.04 17.6 
अमरावती 387.44 1.2 
नागपूर 0.84 0 

Web Title: maharashtra news agriculture Sowing