असे धोकेबाज जन्मतातच कसे? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

आष्टी - दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना धोका देऊन आमच्याकडे आले आणि आम्हालाही धोका दिला. असे लोक जन्मतातच कसे? असे "चंगूमंगू' आले आणि गेले तरी आम्हाला फरक पडत नाही, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केला. 

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य बाळासाहेब आजबे यांनी सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमात पवार बोलत होते. धस यांच्या रूपाने आष्टी मतदारसंघाला आम्ही भरभरून दिले. धस यांना मंत्रिपदाचा लाभ देऊन त्यांच्या आग्रहानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही त्यांच्या समर्थकाला दिले. असे असूनही धोका देणे हा धसांचा स्वभावच बनला. त्यांना यापुढे कधीही पक्षात थारा देणार नाही. सरकारवर टीका करताना पवार म्हणाले, "राज्यावर मागील 54 वर्षांत जेवढे कर्ज झाले त्यात केवळ तीन वर्षांत दीडपट वाढ झाली. शेतकरी, अंगणवाडी कर्मचारी, बस वाहक - चालक अशा सर्वच घटकांच्या सरकार मुळावर उठले आहे. तेलंगणात शेतकऱ्यांना 24 तास वीज देण्याचा तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांची वीज तोडण्याचा निर्णय होतो. शेतीमालाला दोन हजार रुपयांचा भाव आणि जनावरांची पेंड चार हजार रुपये क्विंटल असल्यावर शेतकरी कसा जगेल?' 

Web Title: maharashtra news ajit pawar asti