आंबेडकर स्मारकाच्या नावाने राजकारण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

मुंबई - दादरच्या इंदू मिल जमिनीवर बांधण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात भाजप शिवसेना युतीचे सरकार राजकारण करत असल्याचा आरोप दोन्ही काँग्रेसने आज केला.

मुंबई - दादरच्या इंदू मिल जमिनीवर बांधण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात भाजप शिवसेना युतीचे सरकार राजकारण करत असल्याचा आरोप दोन्ही काँग्रेसने आज केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे भूमिपूजन होऊन दोन वर्षे उलटून गेली, तरीही अजून स्मारकाची एक वीटही रचली गेलेली नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे. दादरच्या चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अहिर यांनी अभिवादन केले, त्या वेळी ते बोलत होते. तसेच काँग्रेसचे मुंबई विभागीय अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले की, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन केले. या भूमिपूजनाचा दोन वर्षांहून अधिक काळ झाला आहे. बिहारच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन त्या वेळी आंबेडकरी जनतेची दिशाभूल करण्यासाठी हे भूमिपूजन करण्यात आले होते. या कामाचे टेंडरिंग ही झालेले नसताना पंतप्रधानसारख्या उच्च पदावर असताना असे भूमिपूजन करणे, हे खेदजनक आहे. हा पण एक बिहारच्या निवडणुकीसाठी चुनावी जुमला होता, असे उद्‌गार निरुपम यांनी काढले.

Web Title: maharashtra news Ambedkar memorial politics Congress NCP dadar indu mill