पशुसंवर्धन विभागाच्या हेल्पलाइनला अत्य प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मुंबई - शेतकऱ्यांना पशुधनावरील उपचार, मार्गदर्शन सहज मिळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने टोल फ्री क्रमांक सुरू केला; पण आठ महिन्यांत अवघ्या 126 जणांनी या टोल फ्री क्रमांकाचा वापर करून सल्ला घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. 

शेतकऱ्यांना पशुसंवर्धनाबाबत मार्गदर्शन मिळावे म्हणून 18002330418 हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला. राज्य सरकारने ग्रामीण भागात मोठा गाजावाजा करत, हा टोल फ्री क्रमांक जाहीर केला; परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पशुधन विम्याचा फायदा 
पशुधन विमा योजनेला मात्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंर्तगत दरवर्षीप्रमाणे 1 ते 15 ऑगस्टदरम्यान विशेष मोहीम राबवण्यात येते. त्यामुळे राज्यात एक लाख 26 हजार पशुधनाचा विमा उतरवण्यात आला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पशुधनाला संरक्षण देण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरत आहे. विम्याची 50 टक्के रक्कम अनुदान स्वरूपात सरकार भरणार आहे. उर्वरित 50 टक्के रक्कम लाभार्थींने भरावयाची आहे.

दारिद्य्ररेषेखालील आणि अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थींना सरकारतर्फे 70 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. उर्वरित 30 टक्के रक्कम लाभार्थींना भरावी लागत आहे. याशिवाय चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली येथील लाभार्थींना 10 टक्के अधिक अनुदान सरकारतर्फे दिले जात असल्याने, या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 45 टक्के शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. 

Web Title: maharashtra news Animal Husbandry farmer