सरकारला शेतकऱ्यांपेक्षा उद्योगपतींची काळजी - हजारे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

करकंब - भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी भ्रष्टाचारात वाढ झाली आहे. माहिती अधिकार कायद्यामुळे सहा मंत्री, तर चारशे वरिष्ठ अधिकारी भ्रष्टाचारामुळे घरी बसले आहेत. या सरकारला शेतकऱ्यांपेक्षा उद्योगपतींची जास्त काळजी आहे, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी केली. 

स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करून शेतमालाला खर्चावर आधारित भाव मिळावा, ज्येष्ठ शेतकऱ्यांना निवृत्तिवेतन द्यावे, या हेतूने जनजागृतीसाठी देशभर दौरे करून २३ मार्च रोजी दिल्लीत आंदोलन करणार आहे, असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. करकंब (ता. पंढरपूर) येथे एका कार्यक्रमात बोलताना अण्णा हजारे म्हणाले, ‘‘शेतमालाला हमी भाव नसल्याने शेती आणि शेतकऱ्यांची घडी विस्कटली आहे. यामुळे मागील २२ वर्षांत १२ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

Web Title: maharashtra news Anna Hazare farmer state government