केजरीवाल यांच्या सभेला अखेर परवानगी 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 जानेवारी 2018

मुंबई - आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 12 जानेवारीला सिंदखेड राजा येथे होणाऱ्या जाहीर सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली. 

मुंबई - आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 12 जानेवारीला सिंदखेड राजा येथे होणाऱ्या जाहीर सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली. 

जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्त केजरीवाल यांनी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करून शाळेच्या मैदानावर दुपारी 12 वाजता जाहीर सभा घेणार आहेत. ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या निमंत्रणावरून ते महाराष्ट्रात पक्षबांधणीसाठी येत आहेत. त्यामुळे, सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्ते, माजी सनदी अधिकारी मोठ्या संख्येने आम आदमी पक्षात प्रवेश करतील, असा आप नेत्यांचा दावा आहे. कोरेगाव भीमाच्या दंगलीनंतर राज्यात संवेदनशील वातावरण असल्याने केजरीवाल यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, सलग दोन दिवस आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनसमोर ठिय्या मांडला होता. त्यामुळे ही परवानगी देण्यात आली आहे. केजरीवाल यांची राज्यातली ही पहिलीच जाहीर सभा असल्याने ते काय बोलतात, याकडे लक्ष लागले आहे. 

Web Title: maharashtra news arvind kejriwal aap