नांदेडमधील विजयाबद्दल राहुल गांधींकडून अभिनंदन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

मुंबई - नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने मिळविलेल्या यशाबद्दल कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांचे ट्‌विट करून शुक्रवारी अभिनंदन केले. 

""नांदेड-वाघाळा महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसने एकूण 81 पैकी 73 जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विजयाचे मोठमोठे दावे करणाऱ्या भाजपला या निवडणुकीत दोन अंकी आकडाही गाठता आला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि एमआयएम या पक्षांना खातेही उघडता आले नाही. या मोठ्या विजयामुळे कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, नांदेडातून सुरू झालेला हा विजयाचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रभर पोचेल आणि आगामी निवडणुकांतही कॉंग्रेस पक्ष विजयी होईल,'' असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. 

Web Title: maharashtra news ashok chavan rahul gandhi congress