कुरेशीवर राज्यातही चार गुन्हे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

मुंबई - दिल्ली स्पेशल सेलने अटक केलेला संशयित दहशतवादी अब्दुल ऊर्फ तौकीर कुरेशीवर राज्यातही चार गुन्हे दाखल होते. सिमी आणि इंडियन मुजाहिद्दीन या संघटनेतील महत्त्वाचा दुवा म्हणून कुरेशीकडे पाहिले जात असून, त्याच्या चौकशीसाठी दहशतवादविरोधी पथकाची (एटीएस) एक टीम लवकरच दिल्लीला जाणार आहे. विशेष म्हणजे, आरोपीकडे नेपाळचे मतदान ओळखपत्रही सापडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

राज्यात सिमीची पाळेमुळे रुजत असताना महत्त्वाच्या सदस्यांपैकी एक असलेल्या कुरेशी याच्याविरोधात राज्य दहशतवादविरोधी पथकात (एटीएस) दोन गुन्हे दाखल आहेत. सिमीवर प्रतिबंधक आणल्यानंतरही त्याच्या सदस्यांच्या बैठका झाल्या. 2006 मध्ये उज्जैन आणि 2008 मध्ये पुण्यात झालेल्या बैठकांमध्ये कुरेशी सामील होता. त्याप्रकरणी हे दोन्ही गुन्हे दाखल आहेत. याशिवाय कुरेशीविरोधात कुर्ला पोलिस ठाण्यातही यूएपीएअंतर्गत गुन्हा दाखल आहे. त्यात इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरके भटकळ बंधू यांनाही सहआरोपी करण्यात आले होते. याशिवाय पायधुनीतील आणखी एका गुन्ह्यात कुरेशीला माझगाव न्यायालयाने 200 रुपयांचा दंडही ठोठावला होता. याशिवाय कुरेशीवर अहमदाबाद स्फोटात सहभागी असल्याचा आरोप आहे; तसेच कर्नाटकातही त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. कुरेशी 1998 मध्ये सिमीचा सदस्य झाला. तो सिमीत तरुणांची भरती करण्याचेही काम करत होता, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

Web Title: maharashtra news ATS terrisot Abdul Qureshi