सर्वाधिक बुद्‌ध्यांकाच्या राजगौरीचा विद्यार्थ्यांशी संवाद 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

बारामती - ‘‘मी जे काही मिळवले आहे, ती काही फार मोठी गोष्ट नाही. माझा जन्म बारामतीच्या ज्या दवाखान्यात झाला, त्या दवाखान्यात इतरही मुले जन्मली आहेत. माझ्यासारखेच तुम्हीही यश मिळवू शकता. माझ्यापेक्षा अधिक यश मिळवू शकता. इथल्या विद्यार्थ्यांमध्येही खूप टॅलेंट आहे. तुम्ही स्वतःला चौकट घालून घेऊ नका,’’ अशा शब्दांत आतापर्यंतचा सर्वाधिक १६२ एवढा बुद्‌ध्यांक मिळवत अल्बर्ट आइनस्टाइन व स्टीफन हॉकिंग यांनाही मागे टाकणारी राजगौरी पवार हिने विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

राजगौरी पवार हिने २२ दिवसांच्या सुटीमध्ये भारतात येताच बारामतीपासून ते दिल्लीपर्यंत हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्यामध्ये आत्मविश्‍वास जागविला आहे. मूळची बारामतीची असलेली राजगौरी सुरजकुमार पवार सध्या बारामतीत आजोळी मुक्कामी आहे. पाटबंधारे शाखेचे निवृत्त अभियंता शिवाजीराव धुमाळ यांची नात असलेल्या राजगौरी व तिचे वडील डॉ. सूरजकुमार पवार यांच्याशी संवाद साधला असता राजगौरीबद्दल आणखीही माहिती मिळाली, जी आजच्या पालक व विद्यार्थ्यांना अनुकरणीय अशीच आहे. राजगौरी आता सहावी इयत्तेत आहे; मात्र आतापर्यंत तिने साडेसातशेहून अधिक वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचली आहेत. ती उत्तम पोहते, एका दमात सव्वा किलोमीटरपर्यंत पोहण्याची तिची क्षमता आहे. त्यातूनच तिला ‘लाइफ गार्ड’चाही मान मिळाला आहे. तिला इंग्लिश, स्पॅनिश, जर्मन, फ्रेंच, इटालियन, हिंदी व मराठी भाषा येतात.  मॅंचेस्टर येथे ५ एप्रिल २०१७ रोजी ब्रिटिश मेन्सा आयक्‍यू टेस्ट पार पडली. त्यामध्ये तिने १६२ अंक मिळवले, त्यानंतर तिची जगभरात दखल घेतली. 

राजगौरी ही गेल्या १८ दिवसांपासून बारामती, पुण्यात आहे. तिने वडिलांसमवेत आसपासच्या शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक, निवृत्त कर्मचाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. तिने १८ दिवसांत १५ हून अधिक शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला आहे. 

‘आवडीच्या क्षेत्राचा विचार करा’
‘सकाळ’शी बोलताना राजगौरी व तिचे वडील डॉ. सूरजकुमार पवार म्हणाले, ‘‘भारतातील शिक्षण पद्धती थोडीशी वेगळी आहे. इथे मुलांच्या एका शैक्षणिक वर्षात खूप परीक्षा होतात. तिमाही, सहामाही, आठमाही, वार्षिक असे हे टप्पे आहेत. मात्र आज जगातील स्थिती पाहता मुलांमधील सामान्य ज्ञान व त्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त त्यांच्यात असलेल्या महत्त्वाकांक्षांचे निरीक्षण करण्याची पद्धत समाविष्ट असायला हवी. मला भारत देश खूप आवडतो. येथील विद्यार्थीही खूप हुशार आहेत. त्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त पुस्तकांचे वाचन नियमित केले पाहिजे. आपल्याला आवड असलेल्या क्षेत्राचाही अभ्यास करावा.’’

Web Title: maharashtra news baramati student IQ