भि. दा. भिलारे गुरुजी यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

भिलार - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार, स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समितीचे सदस्य सचिव आणि ज्येष्ठ गांधीवादी नेते भिकू दाजी तथा भि. दा. भिलारे गुरुजी (वय ९८) यांचे आज पहाटे सव्वापाचच्या सुमारास भिलार (ता. महाबळेश्‍वर) येथे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. 

त्यांच्या मागे तीन विवाहित मुले, तीन विवाहित मुली असा परिवार आहे. भिलारे गुरुजींवर भिलार येथील स्मशानभूमीत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

भिलारे गुरुजींच्या निधनामुळे बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. त्यांचे पार्थिव निवासस्थानासमोरील प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सकाळपासूनच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी गुरुजींच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. दुपारी दोन वाजता फुलांनी सजवलेल्या रथातून अंत्ययात्रा काढण्यात आली. हजारो लोक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले होते. पुस्तकांच्या गावातील एक पान हरपल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत होती.

स्मशानभूमीत शासनाच्या वतीने प्रांताधिकारी अस्मिता मोरे यांनी भिलारे यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पाचगणीचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक कुंडलिक कायगुंडे यांनीही श्रद्धांजली वाहिली. 

Web Title: maharashtra news bhiku daji bhilare