भाजपच्या "मैत्री संवादा'त केंद्रीय मंत्र्यांचाही सहभाग 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

मुंबई - केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारला जनाधार टिकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. दर महिन्याला जनतेचा कल कसा आहे, याचा अंदाज भाजपकडून घेतला जात आहे. यातून जनाधार आटू लागल्याची जाणीव भाजपच्या नेत्यांना झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पक्षाने "मैत्री संवाद' कार्यक्रमाचे आयोजन गेल्या काही दिवसांपासून सुरू केले आहे. यात राज्यातील मंत्री भाजप प्रदेश कार्यालयात जनतेशी संवाद साधतात. यापुढे जाऊन आता भाजपने केंद्रीय मंत्र्यांनाही या कार्यक्रमाला जुंपले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला तीन वर्षे झाली. या कालावधीत सरकारने नोटाबंदी, वस्तू व सेवाकर अंमलबजावणी (जीएसटी) यासारखे धाडसी निर्णय घेतले; मात्र ते अंगाशी आले. यामुळे अर्थव्यवस्था मंदावली आहे. तसेच राज्यातही त्याचे पडसाद उमटले. त्यामुळे ज्या सोशल मीडियाचा आधार घेऊन भाजप सत्तेवर आला, त्याच सोशल मीडियातून जोरदार टीका सध्या होऊ लागली आहे. यामुळे "मैत्री संवाद' कार्यक्रमाचे आयोजन मागील काही दिवसांपासून सुरू झाले असून यात पक्षाचे राज्यातील सर्व मंत्री ठराविक वेळेत प्रदेश कार्यालयात उपस्थित राहून पदाधिकारी, नागरिक यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. तसेच जनतेशी संवाद साधतात. आता केंद्रातील मंत्री या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर उद्या (शनिवार) दुपारी तीन वाजता या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 

Web Title: maharashtra news bjp