भारतात स्वच्छ इंधनावर धावणार 50 हजार बस 

मृणालिनी नानिवडेकर
मंगळवार, 25 जुलै 2017

मुंबई  -येत्या एका वर्षात देशभरात डिझेल किंवा पेट्रोलचा वापर नसलेल्या आणि "स्वच्छ इंधना'वर धावणाऱ्या 50 हजार बसगाड्या विकत घेण्यात येणार आहेत. ठाणे ते मुंबई या प्रवासासाठी किमान 500 गाड्या वापरण्याची योजना तयार करण्यात आली असून, विजेवर चालणाऱ्या 100 बसगाड्या विकत घेण्यासाठी ठाणे महापालिका लवकरच निविदा काढणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी "सकाळ'ला दिली. 

गडकरी म्हणाले की, नागपुरात विजेवर धावणाऱ्या बस विमानतळापासून मुख्य शहरापर्यंत वापरल्या जाणार आहेत. या बसमध्ये इंधन भरण्यासाठी म्हणजेच त्या चार्ज करण्यासाठी 30 इलेक्‍ट्रिक स्टेशन्स नागपुरात सुरू केली जाणार आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद ही राज्यातील चार महानगरे प्रदूषणरहित इंधनाचा वापर करण्यात अग्रेसर व्हावीत, यासाठी योजना तयार होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पास मदत करण्याची तयारी दाखवली आहे. पेट्रोलची किंमत प्रतिलिटर सरासरी 75 रुपये असताना तेवढेच अंतर विजेची गाडी केवळ 7 ते 8 रुपयांत कापू शकते, असेही गडकरी म्हणाले. भारतात वाहन चालवण्याएवढी ऊर्जा कशी तयार होईल या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी सौरऊर्जा तसेच अपारंपरिक ऊर्जास्रोत, बायोडिझेलमुळे मागणी आणि पुरवठ्यातील तूट भरून काढली जाईल, असे सांगितले. ते म्हणाले की, सौरऊर्जेच्या पॅनेलच्या किमती कशा कमी करता येतील आणि त्यावर "मेक इन इंडिया'चा प्रयोग करता येईल का, याचीही तपासणी केली जाणार आहे. 

""देशात 25 लाख वस्तीची 100 विकसित शहरे स्वयंपूर्ण करण्यावर सरकार भर देत आहे. देशातील 30 शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भूपृष्ट वाहतूक विभागाने तयार केला आहे. महानगरांचे चित्र बदलावे यासाठी आवश्‍यक ते सर्व उपाय केले जात असून, वाहतुकीत बदल घडवून आणणे आवश्‍यक आहे.'' 
नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ट वाहतूकमंत्री 

Web Title: maharashtra news bus india