चंद्रकांत पाटलांच्या निवासस्थानाबाहेर राष्ट्रवादीचे आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

मुंबई - कर्नाटकातील गोकाक तालुक्‍यातील तवग गावी दुर्गादेवी मंदिराच्या उद्‌घाटनासाठी गेलेल्या सीमा प्रश्नांचे महाराष्ट्रातील समन्वयक चंद्रकांत पाटील यांनी कन्नड भाषेत गीत गाऊन सीमा भागात राहणाऱ्या मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळल्याची टीका राष्ट्रवादीने केली आहे. 

गेली 62 वर्षे लढा देणाऱ्या सीमा भागातील जनतेच्या भावनांचा त्यांनी विचार करायला हवा होता. मराठीवासीयांवर कर्नाटकात होणाऱ्या अन्यायाबाबत महाराष्ट्रात्तील मंत्री या नात्याने समन्वय साधण्याचे सोडून स्तुतीसुमने उधळणे हा मराठी भाषिक सीमावासीयांचा अपमान असल्याची टीका तटकरे यांनी केली. मराठी माणसांच्या न्याय हक्‍काच्या लढाईचा अवमान समजून चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पाटील यांच्या निवासस्थानी निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला. 

Web Title: maharashtra news chandrakant patil NCP