भुजबळांसाठी "अन्याय पे चर्चा' 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 जानेवारी 2018

मुंबई - राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ भुजबळ समर्थक जोडो अभियानांतर्गत "अन्याय पे चर्चा' हा कार्यक्रम आखण्यात आला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत लवकरच ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात तसेच शहरातील प्रभागांमध्ये भुजबळांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ "अन्याय पे चर्चा' हा अभिनव कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्यानंतर जिल्हा स्तरावर "अन्याय पे महाचर्चा' हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे, अशी माहिती भुजबळ समर्थक समन्वय समितीचे समन्वयक दिलीप खैरे व बाळासाहेब कर्डक यांनी दिली आहे.

भुजबळांच्या समर्थनार्थ नाशिक शहरात नुकतीच सर्वपक्षीय भुजबळ समर्थकांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत भुजबळांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात भुजबळ समर्थक जोडो अभियान राबवण्यात येणार असल्याची घोषणा सर्वपक्षीय भुजबळ समर्थकांनी केली आहे. 

Web Title: maharashtra news chhagan bhujbal