भुजबळांची मालमत्ता जप्त

पीटीआय
गुरुवार, 6 जुलै 2017

नवी दिल्ली/मुंबई - बनावट कंपन्यांचे पैसे वापरून बेनामी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपाखाली प्राप्तिकर विभागाने आज छगन भुजबळ, पुत्र पंकज आणि पुतण्या समीर यांच्या मालमत्तांवर नोटिसा बजावल्या. नाशिक जिल्ह्यामधील गिरणा साखर कारखाना आणि वांद्रे व सांताक्रूझमधील निवासी इमारत यांच्यावर ही कारवाई झाली आहे. या मालमत्तांची मूळ किंमत २३३ कोटी रुपये असून बाजारभावाप्रमाणे त्यांचे मूल्य ३०० कोटी रुपये आहे. 

प्राप्तिकर विभागाने बेनामी व्यवहार प्रतिबंध कायद्यांतर्गत ही कारवाई केली. या कारवाईमुळे भुजबळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गिरणा साखर कारखाना हा आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्‍चरच्या नावे दाखविण्यात आला आहे. या मालमत्ता बोगस कंपन्यांमार्फत भुजबळ कुटुंबीयांच्या अघोषित संपत्तीतूनच खरेदी करण्यात आल्याचे प्राप्तिकर विभागाच्या आजच्या आदेशात म्हटले आहे.  प्राप्तिकर विभागाच्या विशेष तपास पथकाने यापूर्वी केलेल्या तपासात भुजबळांची संपत्ती बोगस कंपन्याच्या माध्यमातून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. मुंबई, कोलकाता आणि इतर ठिकाणांहून बोगस कंपन्या तयार करून त्याआधारे मोठ्या प्रमाणात पैसे उभे केल्याचा ठपका प्राप्तिकर विभागाने ठेवला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी छगन भुजबळ कारागृहात आहेत. जवळपास चार डझनहून अधिक बोगस कंपन्यांतून बेनामी पैसे उभे करून स्थावर मालमत्ता निर्माण केल्याचा आरोप भुजबळांवर ठेवण्यात आला आहे. 

जप्त केलेली संपत्ती
नाशिक येथील ८०.९७ कोटी रुपयांचा गिरणा साखर कारखाना आणि मुंबईच्या सांताक्रूझ येथील बहुमजली सॉलिटेअर इमारत. कारखाना आर्मस्ट्राँग इंफ्रास्ट्रक्‍चर प्रा. लिमिटेड नावाने, तर इमारत परवेश कन्स्ट्रक्‍शन नावाने होती. इमारतीची किंमत ११ कोटी रुपयांहून अधिक आहे. 

वांद्रे पश्‍चिम परिसरातील हबीब मानोर आणि फातिमा मानोर या इमारती - किंमत ४३.६१ कोटी रुपये 

पनवेल येथील एका बेनामी प्लॉटची किंमत ८७.५४ कोटी रुपये.

बेनामी संपत्तीची एकूण किंमत २२३ कोटी रुपये असली तरीही प्रत्यक्षात त्याची बाजारातील एकूण किंमत ३०० कोटींच्या घरात

‘नवी कारवाई नाही’
मालमत्तांसंबंधी गेल्या महिन्यात प्राप्तिकर विभागाने नोटिसा दिल्या होत्या. त्यांना उत्तरही देण्यात आले होते. सर्व मालमत्ता आधीच जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्याच पुन्हा जप्त केल्याचे दाखविण्यात आले आहे. काही प्रकरणात लवादाने कारवाईस स्थगिती दिली आहे, असा खुलासा भुजबळ कुटुंबीयांतर्फे करण्यात आला आहे.

Web Title: maharashtra news chhagan bhujbal assets seized