"मी लाभार्थी'ला दिले मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केलेल्या जाहिरातीत झळकलेले पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्‍यातील भिंगरी गावाचे शेतकरी शांताराम तुकारात कटके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेतली. या वेळी शेततळ्यासाठी फडणवीस सरकारकडून अनुदान मिळाल्याचा दावा कटके यांनी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना धन्यवाद दिल्याचे कटके यांनी "सकाळ'ला सांगितले. 

फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने "मी लाभार्थी' या शीर्षकाने केलेल्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. या जाहिरातीत कटके यांना संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या कार्यकाळात शेततळ्यासाठी "रोहयो' योजनेंतर्गत अनुदान देण्यात आले असताना राज्य सरकारने चुकीच्या पद्धतीने श्रेय घेण्यासाठी जाहिरात केल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. या वृत्ताच्या आधारावर विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडल्यामुळे सरकारी जाहिराती खऱ्या की खोट्या, यावरील चर्चांना उधाण आले होते. राज्य सरकारने या सरकारी जाहिराती खऱ्या असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. 

दरम्यान, या वादंगामुळे चर्चेत आलेल्या शांतारात कटके यांच्या घराकडे प्रसारमाध्यमांची रीघ लागली. त्यांना चुकविण्यासाठी घराला कुलूप लावून अन्यत्र लपण्यासाठी कटके यांची धावाधाव सुरू झाली. यात जनावरे आणि शेतीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे नुकसान झाल्याची माहिती कटके यांनी दिली. या वादातून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी जलसंपदा राजयमंत्री विजय शिवतारे यांना संपर्क साधला असता शिवतारे यांनी कटके यांना आज मंत्रालयात बोलावून मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणली. या भेटीत फडणवीस यांनी कटके यांना अक्षरशः मिठी मारली. शेततळ्यासाठी राज्य सरकारकडून अनुदान मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले असता फडणवीस यांनी त्यांचे आभार मानल्याचे कटके म्हणाले. तसेच शेती आणि जनावरांची देखभाल करण्यास वेळ मिळावा, यासाठी प्रसारमाध्यमांनी आपणास भेटण्याचे टाळावे, असे आवाहन कटके यांनी केले. 

Web Title: maharashtra news Chief Minister state government