'पराभवामुळे भ्रमिष्ट झालेल्या कॉंग्रेसकडून बालीश आरोप'

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

मुंबई - ""पंचायत ते पार्लमेंट सर्व निवडणुकांमध्ये सतत पराभव झाल्यामुळे कॉंग्रेस पक्ष भ्रमिष्ट झाला असून, निराशेपोटी भाजपच्या नेत्यांवर बालीश आरोप करत आहे,'' अशी टीका राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या मुलावर कॉंग्रेसने केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. 

भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भंडारी व प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते. 

पाटील म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही सोमवारी भाजपला जबरदस्त यश मिळाले. त्यामुळे हताश झालेले कॉंग्रेसचे नेते बालीश आरोप करतात. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जय शहा यांच्या कंपनीला 80 कोटी नफा झाल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. प्रत्यक्षात जय शहा यांच्या कंपनीची उलाढाल 80 कोटी होती. पृथ्वीराज चव्हाण अपुऱ्या माहितीच्या आधारे बोलत आहेत. तावडे म्हणाले की, जय शहा यांच्या कंपनीच्या बाबतीत काहीही चुकीचे काम केलेले नाही. त्यांनी सच्चाईने व्यवहार केला आहे. अशा प्रकारे खोटे आरोप करून भारत "कॉंग्रेसमुक्त' करण्यापासून भाजपला कोणीही रोखू शकत नाही. 

Web Title: maharashtra news congress chandrakant patil