धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या: अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

या सरकाकडे शेतकऱ्यांचे भले करावे अशीच इच्छाशक्तीच नाही. सरकारच्या सावकारीला जनतेचा विरोध आहे. शेतकऱ्याचा जीव गेल्यानंतर फेरमुल्यांकनाची घाई करण्यात येत आहे. सरकारची अनास्था दिसून येते, माणसं मेली तरी सरकार गंभीर नाही, धर्मा पाटलांची हत्या सरकारने केली.

मुंबई - धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या आहे. सरकारविरोधात 302 चा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी जोरदार टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

Maharashtra news Congress MP Ashok Chavan statement on farmer Dharma Patil death

जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी न्यायाची मागणी करत विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे रविवारी रात्री निधन झाले. शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे धर्मा पाटील हे त्रस्त झाले होते. अखेर वैतागून त्यांनी गेल्या सोमवारी मंत्रालयामध्ये विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सरकारकड़े जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून पाठपुरावा करुन निराश झालेल्या आणि विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या धर्मा पाटील यांची मृत्युशी झुंज देताना रविवारी रात्री अखेर त्यांची प्राणज्योत जेजे रुग्णालयात मालविली.

याविषयी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, की या सरकाकडे शेतकऱ्यांचे भले करावे अशीच इच्छाशक्तीच नाही. सरकारच्या सावकारीला जनतेचा विरोध आहे. शेतकऱ्याचा जीव गेल्यानंतर फेरमुल्यांकनाची घाई करण्यात येत आहे. सरकारची अनास्था दिसून येते, माणसं मेली तरी सरकार गंभीर नाही, धर्मा पाटलांची हत्या सरकारने केली. धर्मा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

Web Title: Maharashtra news Congress MP Ashok Chavan statement on farmer Dharma Patil death