घरातील छोट्या उद्योजकांवर कारवाई नको  न्यायालय 

घरातील छोट्या उद्योजकांवर कारवाई नको  न्यायालय 

मुंबई - घरामध्ये पाळणाघर किंवा अन्य प्रकारची व्यावसायिक कामे करणाऱ्या छोट्या उद्योजकांवर कारवाई करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच मीरा-भाईंदर महानगरपालिकेला मनाई केली. या उद्योजकांचा व्यवसाय नियमित करण्याबाबत निर्णय घेण्याचे आदेशही न्यायालयाने महापालिकेला दिले. 

वाढत्या महागाईमुळे मुंबईसह अनेक शहरांतील घरांमध्ये पाळणाघर, खानावळ, ब्युटी पार्लर असे अनेक उद्योग केले जातात; मात्र असे उद्योग करण्यासाठी महापालिकेकडून रीतसर परवानगी घेणे आवश्‍यक असते. मीरा-भाईंदरमध्ये पाळणाघर आणि अन्य प्रकारचे छोटे व्यवसाय करणाऱ्या काही व्यावसायिकांना पालिकेने कारवाईची नोटीस बजावली आहे. घराचा वापर व्यवसायासाठी करताना नियमानुसार पालिकेची परवानगी घेतली नाही, त्यामुळे कारवाई का करू नये, अशी विचारणा त्याद्वारे करण्यात आली आहे. संबंधितांकडून व्यावसायिक कराची मागणीही पालिकेने केली. या नोटिसांविरोधात अनेक व्यावसायिकांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेवर न्या. वासंती नाईक आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com