शेतकरी संपावर अन् सरकार शांत कसे?: धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शेतकरी जगला तर देश जगेल, जागे व्हा. शेतकऱ्यांच्या संपाची दखल घ्या, त्यांच्या मागण्या मान्य करा.

मुंबई - जगाचा पोशिंदा शेतकरी संपावर असताना सरकार शांत कसे राहू शकते? हा तर सरकारच्या असंवेदनशीलतेचा कळसच आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

शेतात जाणाऱ्या बळिराजाने नांगर खाली ठेवला असून, चक्क संपाचे हत्यार उपसले आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक शेतकऱ्यांच्या बेमुदत संपाला बुधवारी मध्यरात्रीपासून सुरवात झाली. शेतकरी कर्जमाफी आणि शेतीमालाला योग्य भाव या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. आज पहाटे शिर्डी, मनमाड, नगर, सातारा याठिकाणी शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून आंदोलन केले. सरकारच्या विविध विभागांमधील समन्वय अभावामुळे शहरातील दूध, भाजीपाला पुरवठ्यावर संपाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. 

धनंजय मुंडे यांनी या संपाविषयी सरकारला लक्ष्य केले आहे. मुंडे यांनी ट्विट करत म्हटले आहे, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शेतकरी जगला तर देश जगेल, जागे व्हा. शेतकऱ्यांच्या संपाची दखल घ्या, त्यांच्या मागण्या मान्य करा. जगाचा पोशिंदा शेतकरी संपावर असताना सरकार शांत कसे राहू शकते?

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
एेतिहासिक शेतकरी संपाला महाराष्ट्रात सुरवात​
शेतकरी संपाला साहित्यिकांनी पाठिंबा द्यावा: रामदास फुटाणे
सोलापूरात फुले रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचा संपात सहभाग
सोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार
'आयटी'तील तरुणीची गोळ्या घालून हत्या; प्रियकरानेच हत्या केल्याचा संशय​
प्रांजल पाटील देशातील 'पहिली' दृष्टिहीन विद्यार्थिनी जिल्हाधिकारी
जनावरे खरेदी-विक्रीच्या निर्णयात हस्तक्षेप नाही- केरळ उच्च न्यायालय​
मराठवाड्यात दीडशे दिवसांत 361 शेतकरी आत्महत्या​
अभिनेत्री सनी लिओनीच्या विमानाचा अपघात टळला

Web Title: maharashtra news Dhananjay Munde criticized government on #farmerstrike