डॉ. आंबेडकर स्मारकाचा आराखडा मांडावा 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

मुंबई - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे सेवा सुविधा देण्यासाठी सर्व विभागांनी नियोजन करून अनुयायांना चांगल्या सेवा द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच या काळात इंदू मिल येथील स्मारकाच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा आराखडा मांडण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी या वेळी केली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक झाली. या वेळी फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांना चांगल्या सेवा देण्यात याव्यात. या काळात बाहेरून येणाऱ्या अनुयायांसाठी रेल्वेने विशेष व्यवस्था करावी, यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. शिवाजी पार्क परिसरात बार्टीमार्फत अल्पोपहार व भोजनाची सोय यंदाही करण्यात येणार आहे. चैत्यभूमी येथे येणारे अनुयायी हे इंदूमिल येथील स्मारकाच्या जागेलाही भेट देतात. त्यामुळे तेथेही सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. तसेच स्मारकाची प्रतिकृती ठेवण्यास एमएमआरडीएला सांगण्यात आले आहे. तसेच स्मारकाच्या कामाचे कार्यारंभ आदेश तातडीने देण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी केली. बोरिवली येथील पॅगोडा येथे भेट देणाऱ्यांसाठी विशेष बस व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. 

Web Title: maharashtra news Dr. babasaheb ambedkar