डीएसके 50 कोटी जमा करणार 

डीएसके 50 कोटी जमा करणार 

मुंबई - गुंतवणूकदारांना फसविल्याचा आरोप असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून 19 डिसेंबरपर्यंत सशर्त दिलासा मिळाला आहे. 15 दिवसांत 50 कोटी न्यायालय रजिस्ट्रारकडे जमा करण्याची हमी कुलकर्णी यांनी आज प्रतिज्ञापत्राद्वारे दिली. 

डीएसके समूहाच्या कायमस्वरूपी ठेवींमध्ये सुमारे एक हजार 350 जणांनी पैसे गुंतविले आहेत. मात्र त्या रकमेचा परतावा न मिळाल्यामुळे 200 पेक्षा अधिक पोलिस तक्रारी पोलिस ठाण्यामध्ये केल्या आहेत. यामध्ये अटक होण्याच्या भीतीने कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. गुंतवणूकदारांचे पैसे कसे परत करणार, याबाबत सविस्तर माहिती दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आज न्या. अजय गडकरी यांच्यापुढे कुलकर्णी यांच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. यानुसार 15 दिवसांमध्ये 50 कोटी जमा करण्याची हमी कुलकर्णी यांनी दिली आहे. ही रक्कम जमा करण्यास विलंब झाला तर त्यांना अटक होऊ शकते आणि त्यांना पोलिसांना शरण जाणे सक्तीचे आहे, असेही यामध्ये स्पष्ट केले आहे. गुंतवणूकदारांचे सुमारे 200 कोटी कुलकर्णी यांनी थकविले आहेत, यापैकी 25 टक्के रक्कम त्यांना सध्या जमा करायची आहे. डीएसके कुलकर्णी यांच्या मालमत्तेवर काही बॅंकांनी कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com