ईडी व सीबीआयकडून इंद्राणी, पीटर यांची चौकशी

ईडी व सीबीआयकडून इंद्राणी, पीटर यांची चौकशी

मुंबई - आयएनएक्‍स मीडियाप्रकरणी इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जीची आज सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) व केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशी केली. त्यांची आणखी दोन दिवस चौकशी होण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्‍त केली. यापूर्वी २४ नोव्हेंबरला इंद्राणीची याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती.

इंद्राणीची भायखळा तुरुंगात चौकशी करण्यात आली. सहायक संचालकपदाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ईडीच्या पथकाने ही चौकशी केली. तसेच पीटर मुखर्जीचीही चौकशी करण्यात आली. त्यांची आणखी दोन दिवस चौकशी होण्याची शक्‍यता आहे. इंद्राणीच्या चौकशीत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. या माहितीची पडताळणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत केंद्रीय अन्वेषण विभागाचे प्रवक्ते आर. के. गौर यांनी सांगितले की, सीबीआयने इंद्राणी व पीटर या दोघांचीही चौकशी केली.

पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्‍स मीडिया या कंपनीला नियमापेक्षा अधिक विदेशी गुंतवणूक मिळवून दिल्याचा आरोप आहे. कंपनीला फक्त ४.६२ कोटींची विदेशी गुंतवणूक करण्याची परवानगी असताना त्यांनी ३०५ कोटी रुपये उभे केले, असा आरोप आहे. काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित आयएनएक्‍स मीडिया फर्ममधील परकी गुंतवणुकीस मान्यता देताना झुकते माप दिल्याचा आरोप आहे. सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने कार्ती, पीटर, इंद्राणी मुखर्जी व अन्य संबंधितांविरोधात सक्तवसुली प्रकरण माहिती अहवाल (ईसीआयआर) नोंद केला होता. ईसीआयआर हा एकाअर्थी एफआरआर असून, त्याअंतर्गत या प्रकरणात झालेला गैरव्यवहार व संबंधितांच्या मालमत्तेची चौकशी सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com