"मेरा बेटा देश के लिये अच्छा काम करे' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

अर्धापूर - आपल्या मुलाने चांगले काम करून नावलौकिक करावा, असे प्रत्येक पालकांना वाटते. त्याचा होणारा सन्मान, सत्कार, पाहून उर भरून येतो. असेच चित्र यंदाचा राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार मिळालेल्या पार्डी येथील एजाज नदाफ याच्या घरी पाहाण्यास मिळाले. "मेरे एजाजने घर का और गाव का नाम निकाला है, मेरा बेटा देश के लिये अच्छा काम करे, यही दुवा भगवान से मांगते है', अशा भावना व्यक्त करताना एजाजची आई शमीम बेगम यांना गहिवरून आले. आपल्या मुलाच्या धाडसाने दोन जीव वाचले याचे समाधानही त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले. 

पार्डी येथील राजाबाई हायस्कूलचा विद्यार्थी एजाज अ. रऊफ नदाफ याला भारतीय बालकल्याण परिषदेतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार बुधवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरणानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्तेही पुरस्कारप्राप्त बालवीरांचा सन्मान झाला. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथील पथसंचलनामध्येही एजाजला सहभाग घेता येणार आहे. देशातील 18 बालकांना या पुरस्काराचे आज वितरण करण्यात आले. महाराष्ट्रातून एजाज हा एकमेव होता. लष्करप्रमुख बिपीन रावत, तिन्ही दलांचे प्रमुख, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नायब राज्यपालांसह विविध मान्यवरांनीही या मुलांचे कौतुक केले. 

दरम्यान, दिल्लीत आज झालेल्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राजाबाई विद्यालयाचे सर्व शिक्षक, गावातील ग्रामस्थ गेले आहेत. पार्डीसह तालुक्‍यात विविध ठिकाणी दूरचित्रवाहिनीवर आज या कार्यक्रमाचा आनंद ग्रामस्थांनी घेतला. एजाजची आई शमीम बेगम व वडीलबंधू इलियास यांनी हा सोहळा दूरदर्शनवर गावातच पाहिला. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आपल्या मुलाचा सन्मान होताना पाहून शमीम बेगम यांना गहिवरून आले. आपल्या मित्राचा सन्मान पाहून येथील त्याच्या मित्रांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. ग्रामस्थांतही उत्साहाचे वातावरण पाहण्यास मिळाले.

Web Title: maharashtra news Ejaz Nadaf Bravery Award