"ईव्हीएम' गैरकाराभाराबाबत निवेदन करण्याचा आदेश 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 जुलै 2017

मुंबई  - विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी बुलडाण्यातील "ईव्हीएम' गैरकाराभाराबाबत निवेदन करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला आहे. कॉंग्रेसचे संजय दत्त यांनी स्थगन प्रस्ताव मांडत विधान परिषदेत सभागृहाचे लक्ष वेधले. 

दत्त म्हणाले, की बुलडाणा जिल्हा परिषदेतील केंद्र क्रमांक 56- सुलतानपूर (ता. लोणार) येथे फेब्रुवारी 2017 मध्ये निवडणूक झाली होती. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार आशा जोरे यांचे नारळ हे चिन्ह होते. या ठिकाणी झालेल्या मतदानाबाबत जोरे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. निवडणूक अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेत तपासणी केल्यावर "नारळ' या चिन्हासमोरील बटण दाबल्यानंतरही मत भाजपच्या उमेदवाराला जात असल्याचा अहवाल दिला आहे. बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी याबाबतचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. 

या अहवालानुसार "ईव्हीएम' यंत्रात फेरफार करता येऊ शकतो हे यामुळे सिद्ध झाले आहे, असे दत्त यांनी सांगितले. अशा प्रकारच्या तक्रारी यापूर्वीदेखील झाल्या असून, राज्य निवडणूक आयोगाने मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप दत्त यांनी केला. त्यांच्या स्थगन प्रस्तावाची दखल घेऊन याबाबत सभागृहात निवेदन करण्याचा आदेश रामराजे यांनी सरकारला दिला.

Web Title: maharashtra news EVM