"राज्यातील दोन हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी नको' 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 जुलै 2017

मुंबई - राज्यातील सुमारे 2 हजार शेतकऱ्यांनी कर्जमाफीस पात्र असतानाही आम्हाला ही सवलत नको, असे राज्य सरकारला कळवले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, गेले काही दिवस राज्य सरकारला विनंती अर्ज पाठवले जात आहेत. शेतकऱ्यांनी या कर्जास आम्ही पात्र असलो तरी आम्हाला कर्जमाफी देऊ नका असे कळवले आहे. येत्या काही दिवसांत या संख्येत वाढ होईल असा अंदाजही सरकारतर्फे व्यक्‍त केला जात आहे. कर्जमाफीस आम्ही पात्र आहोत; पण राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता कर्जमाफी नको, असे स्पष्ट शब्दांत कळवले आहे.

मुंबई - राज्यातील सुमारे 2 हजार शेतकऱ्यांनी कर्जमाफीस पात्र असतानाही आम्हाला ही सवलत नको, असे राज्य सरकारला कळवले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, गेले काही दिवस राज्य सरकारला विनंती अर्ज पाठवले जात आहेत. शेतकऱ्यांनी या कर्जास आम्ही पात्र असलो तरी आम्हाला कर्जमाफी देऊ नका असे कळवले आहे. येत्या काही दिवसांत या संख्येत वाढ होईल असा अंदाजही सरकारतर्फे व्यक्‍त केला जात आहे. कर्जमाफीस आम्ही पात्र आहोत; पण राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता कर्जमाफी नको, असे स्पष्ट शब्दांत कळवले आहे. राज्य सरकारवर असलेला आर्थिक बोजा नियंत्रणात राहावा यासाठी शेतकरी ही पावले उचलत असल्याचेही सांगण्यात येत आहे. सरकारने कर्जमाफीची घोषणा करताच काही आमदारांनी आम्हाला कर्जमाफी नको असे पत्र पाठवले होते आणि आता नव्याने करण्यात येणारे अर्जही याच मालिकेतील आहेत. राज्यातल्या प्रत्येक गरजू शेतकऱ्याला मदत मिळावी यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: maharashtra news farmer loan