शेतकरी कर्जमुक्तीची जिल्हानिहाय आकडेवारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

बुलडाणा जिल्ह्यात सर्वात जास्त 2 लाख 49 हजार 818 शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असून यात यवतमाळ जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागला आहे. या जिल्ह्यातील 2 लाख 42 हजार 471 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे.

मुंबई - राज्यात शेतकऱ्यांसाठी 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर कुठल्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, याबाबत सविस्तर आकडेवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन जाहीर केली.

विशेष म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबई अशी ओळख असलेल्या मुंबईतही शेकडो शेतकरी शेती करीत असून राज्य सरकारच्या कर्जमाफीचा फायदा या शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान राज्यातील बुलडाणा जिल्ह्यात सर्वात जास्त 2 लाख 49 हजार 818 शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असून यात यवतमाळ जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागला आहे. या जिल्ह्यातील 2 लाख 42 हजार 471 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. तर ठाणे जिल्ह्यातील सर्वात कमी म्हणजेच 23 हजार 505 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील सुमारे साडेचार लाख शेतकरी कर्जदार असतांना केवळ 28 टक्केच शेतकरी पात्र होत असल्याने 1 लाख 36,569 शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचे दिसतेय.

जिल्हानिहाय यादी 
■अहमदनगर - 2 लाख 869 
■औरंगाबाद - 1 लाख 48,322 
■बुलडाणा - 2 लाख 49,818 
■गडचिरोली - 29 हजार 128 
■जळगाव - 1 लाख 94,320 
■लातूर - 80 हजार 473 
■नागपूर - 84 हजार 645 
■परभणी - 1 लाख 63,760 
■रत्नागिरी - 41 हजार 261 
■सिंधुदुर्ग - 24 हजार 447 
■वाशिम - 45 हजार 417 
■अकोला - 1 लाख 11,625 
■बीड - 2 लाख 8 हजार 480 
■चंद्रपूर - 99 हजार 742 
■गोंदिया - 68 हजार 290 
■जालना - 1 लाख 96,463 
■मुंबई शहर - 694 
■मुंबई उपनगरे - 119 
■नांदेड - 1 लाख 56,849 
■उस्मानाबाद - 74,420  
■पुणे - 1 लाख 83 209  
■सांगली - 89 हजार 575
■सोलापूर - 1 लाख 8,533
■यवतमाळ - 2 लाख 42,471 
■अमरावती - 1 लाख 72 ,760 
■भंडारा - 42 हजार 872 
■धुळे - 75 हजार 174 
■हिंगोली - 55 हजार 165 
■कोल्हापूर - 80 हजार 944
■नंदुरबार - 33 हजार 556 
■पालघर - 918 
■रायगड - 10 हजार 809 
■सातारा - 76 हजार 18 
■ठाणे - 23 हजार 505


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra news farmer loan waiver district wise list