मराठवाडा व विदर्भातील शेतकरी अडचणीत 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

मुंबई - यंदा पावसाने बसलेला फटका, कीटकनाशक विषबाधेचे संकट आणि आता गुलाबी बोंड अळीसह अनेक प्रकारच्या रोगाची पिकांना लागण झाल्याने मराठवाडा व विदर्भातला शेतकरी प्रचंड अडचणीत असल्याची खंत शेतकरी मिशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्‍त केली आहे. शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेत अडचणीतील शेतकऱ्यांना मदत करण्याची विनंती केली आहे. 

मराठवाडा व विदर्भात यंदा हमीभावापेक्षा कमी दरात कापूस, सोयाबीन, धान, मूग, उडदाची खरेदी सुरू असल्याचेही त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणले. 

नाफेड व सी सी आय, पणन महामंडळ यांच्या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांना होत असलेला प्रचंड त्रास यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील सुमारे 70 लाखांवर शेतकरी कुटुंबे दशकातील सर्वांत मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. तेव्हा राज्य सरकारने सर्व कापूस, सोयाबीन, धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी विनंती तिवारी यांनी केली.

Web Title: maharashtra news farmer marathwada vidarbha