शेतकरी संपाबाबत घाईघाईत घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप : जयाजी सूर्यवंशी

टीम ई सकाळ
शनिवार, 3 जून 2017

जयाजी सूर्यवंशी औरंगाबाद येथील अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत. सुरूवातीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रस पक्षात ते सक्रिय होते; परंतू नंतर उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत त्यांनी मागील विधानसभा निवडणूकीवेळी नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने शेतकरी आंदोलनात सक्रिय झाले.

मुंबई- 'काल रात्री घाईघाईत घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप होत असल्याची' कबूली शेतकरी आंदोलनातील नेते जयाजी सूर्यवंशी यांनी आज (शनिवार) दुपारी दिली. 

राज्यातील शेतकरी संप मिटल्याची आज पहाटे घोषणा करण्यात आली. मात्र या निर्णयाने संपामध्ये फूट पडल्याची चर्चा सुरु झाली. सरकारशी तडजोड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जयाजी सूर्यवंशी यांच्यावर संप मिटवण्याचा घाट घातल्याबद्दल जोरदार टिका झाल्यानंतर जयाजी यांनी ही कबूली दिली. टीव्ही9 मराठी या वृत्तवाहीनी सोबत बोलताना सूर्यवंशी यांनी ही कबुली दिली. 

सूर्यवंशी हे औरंगाबाद येथील अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत. सुरूवातीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रस पक्षात ते सक्रिय होते; परंतू नंतर उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत त्यांनी मागील विधानसभा निवडणूकीवेळी नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने शेतकरी आंदोलनात सक्रिय झाले.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
ऐतिहासिक शेतकरी संपात 48 तासात फूट; एक गट संपावर ठाम
चोपडा: भाजीपाला फेकला रस्त्यावर
शेतकऱ्यांचा संप मागे; कर्जमाफीसाठी समिती 
शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली आश्वासने
शेतकऱ्यांच्या पदरात पडले काय?; किसान सभा असमाधानी
सत्तर टक्के मागण्या मान्य झाल्याने संप मागे: धोर्डे​
शेतकऱ्यांना संपवण्याचे सरकारचे धोरण - शरद पवार

'ईव्हीएम' हॅकेथॉन आज होणार
मेनका गांधी रुग्णालयात दाखल​ 

Web Title: Maharashtra news farmer strike Jayaji Suryavanshi reaction