शेतकरी सुकाणू समितीचे चक्का जाम..! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

मुंबई - शेतकरी कर्जमाफी व हमीभाव यावरून शेतकरी संघटनांना दिलेल्या आश्वासनाची सरकारने पूर्तता केली नसल्याचा आरोप करत उद्या (ता. 14) सुकाणू समितीने राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन पुकारले आहे. आता "आरपार'ची लढाई छेडणार असल्याचा इशारा सुकाणू समितीने या वेळी दिला. 

सरकारने शेतकरी कर्जमाफी जाहीर केली; मात्र यामध्ये शेतकऱ्यांना लाभ होणार नाही, यासाठी सतत बदल करत सरकारने थट्टा लावली आहे. कर्जमाफीसाठी ऑनलाइन फॉर्म भरून घेताना शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत. केवळ कागदावर असलेल्या कर्जमाफीचा ढोल पिटत सरकरा स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे, असा आरोप सुकाणू समितीने पत्रकातून केला आहे. शेतकरी सुकाणू समितीला एका महिन्यात हमीभाव कायद्यात बदल करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते; मात्र विधिमंडळ अधिवेशन संपले तरी सरकारने यामध्ये कोणताही बदल केला नाही, त्यामुळे सुकाणू समितीला आता परत संघर्ष करण्याची वेळ आल्याचेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

Web Title: maharashtra news farmer sukanu committee