कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सात दिवसांची मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

22 सप्टेंबर2017 पर्यत शेतकऱ्यांना  ऑनलाईन अर्ज भरता येणार 
- सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची  माहिती

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 15 सप्टेंबर 2017 होती. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी 7 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, आता दिनांक 22 सप्टेंबर 2017 पर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली.  या मुदतीच्या आत सर्व शेतकऱ्यांनी अर्ज भरावे, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.

आजपर्यंत  96 लाख 59 हजार 740 अर्जाची  नोंदणी झाली असून 49 लाख 56 हजार 305 शेतकरी कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. कर्ज माफीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत या आधी 15 सप्टेंबर 2017  होती. ती मुदत उद्या दिनांक 15 सप्टेंबर 2017 रोजी  संपणार होती. अजून अनेक शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन भरण्याचे बाकी असल्याचे लक्षात आल्यानंतर, या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ही मुदतवाढ 22 सप्टेंबर 2017 पर्यंत देण्यात आली असल्याचे देशमुख यांनी  सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: maharashtra news farmers loan waiver online application