अमित शहांकडून गिरीश महाजन, राम शिंदे यांची खरडपट्टी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

अमित शहा मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी सर्व मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला होता. शेतकरी आंदोलनाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर शहा यांनी हे आंदोलन जास्त कुठे भडकले ? असा सवाल उपस्थित केला.

मुंबई : नगर आणि नाशिकमध्ये शेतकरी आंदोलन पेटले असताना तुम्ही काय करत होता? माझ्याकडे अल्टरनेटिव्ह (पर्याय) आहे, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन व जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांची खरडपट्टी काढली.

अमित शहा मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी सर्व मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला होता. शेतकरी आंदोलनाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर शहा यांनी हे आंदोलन जास्त कुठे भडकले ? असा सवाल उपस्थित केला. त्यावर नाशिक व नगरमध्ये आंदोलन जास्त पेटल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
 
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन व नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांना दोघांनाही शहा यांनी फैलावर घेतले. आंदोलन भडकले असताना तुम्ही काय करीत होता ? तुम्ही त्या शेतक-यांना भेटला का ? तुम्हाला जे काही मिळाले आहे, ते पक्षामुळे मिळाले आहे, हे लक्षात ठेवा. नाही तर माझ्याजवळ दुसरा पर्याय आहे, अशा शब्दांत त्यांनी खडसावले. या भेटीमध्ये शहा यांनी अनेक आमदारांनाही खडसावल्याचे सूत्रांनी सांगितले. 'मेरे पास अल्टरनेटीव्ह है' हे वाक्य त्यांनी अनेकांसाठी वापरले. या वाक्यातून 'चांगले काम केले नाही तर तुमची गच्छंती होऊ शकते' असे त्यांनी सुचविल्याचे या सूत्रांचे म्हणणे आहे.

सरकारनामा साईटवरील राजकीय घडामोडी वाचण्यासाठी क्लिक करा ः
राजकीय नेत्यांचा योग दिनात कृतिशील सहभाग
पीककर्ज पेरणीसाठी, की काढणीसाठी ?​
सदाभाऊ "कर्जमुक्‍त' ! शेट्टींबरोबरचा "तो' व्यवहार पुर्ण !​
नवी मंबई महापालिकेत पुन्हा तुकाराम मुंढेंविरोधी सूर​
कर्जमाफीबाबतच्या सरकारी आदेशाची उद्या राज्यभर होळी - डॉ. नवले​
सदाभाऊचे मंत्रिपद तुला देतो असे मुख्यमंत्र्यांनी कानात सांगितले - जयाजी सूर्यवंशी​
शेतकरी आत्महत्या अन्‌ 50 हजार कोटींचा दान-धर्म !​

 

Web Title: Maharashtra News Girish Mahajan, Ram Shinde's rebuttal from Amit Shah