कारवाईवरील स्थगिती कायम 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

मुंबई - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या खटल्याच्या कारवाईवरील अंतरिम स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी कायम ठेवली. अद्याप पोलिस तपास सुरू असल्यामुळे ही स्थगिती देण्यात आली आहे. 

पानसरे हत्याकांडप्रकरणी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई सुरू आहे; मात्र ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी आरोपींचा संबंध आहे का, याबाबत पोलिस तपास करत आहे. त्यामुळे खटल्याला काही काळ स्थगिती देण्याची मागणी न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्यापुढे सरकारच्या वतीने ऍड. अशोक मुंदरगी यांनी केली होती. 

वर्षभरापासून या खटल्याला स्थगिती देण्यात आलेली आहे. या खटल्यामध्ये न्यायवैद्यक अहवाल दाखल झाला आहे. त्यामध्ये महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत. त्यावर तपास सुरू असल्याची माहिती मुंदरगी यांनी दिली. आरोपींच्या वतीने ऍड. संजीव पुनाळकर यांनी या मागणीला विरोध केला; मात्र पीडित कुटुंब आणि आरोपी या दोघांच्या अधिकारांमध्ये बाधा येता कामा नये, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. याचिकेवर पुढील सुनावणी 23 जानेवारीला होणार आहे. पानसरे यांची हत्या कोल्हापूरमध्ये फेब्रुवारी 2015 मध्ये; तर दाभोलकर यांची हत्या ऑगस्ट 2013 मध्ये पुण्यात झाली होती.

Web Title: maharashtra news Govind Pansare murder case